Advertisement

अजाणावर भाष्य करणारा 'भोंगा' चित्रपट या दिवशी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला


अजाणावर भाष्य करणारा 'भोंगा' चित्रपट या दिवशी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' या चित्रपटानं चित्रपट प्रदर्शनापूर्वीच आपलं नाव प्रत्येक सिनेप्रेमींच्या हृदयावर कोरलं आहे. ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एका वेगळ्या अनुषंगानं हा 'भोंगा' चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. अभिनेत्री दिप्ती धोत्रे, अभिनेता कपिल कांबळे, श्रीपाद जोशी, अमोल कागणे, पवन वैद्य, आकाश घरत यांचाही अभिनय पाहायला मिळणार आहे.

'भोंगा' चित्रपटाची कथा ही अजाणावर भाष्य करणारी आहे. या कुटुंबातील नऊ महिन्याच्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दुर्धर आजार झालेला असतो. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर आणखीन परिणाम होत जातो, बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव तर पाहतच असतो, हा त्रास थांबवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले जातात अथवा चित्रपटात नेमके काय घडते? हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढून राहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती निर्माते, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली आहे. या आशयघन चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी पेलवली. तर 'अमोल कागणे फिल्म्स' प्रस्तुत हा चित्रपट असणार आहे.

या चित्रपटाची कथा आणि संवाद शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे लिखित आहेत. तर चित्रपटातील गाणी विजय गटलेवार यांची असून गाण्याचे बोल सुबोध पवार लिखित आहेत. चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी रामनी रंजन दास यांनी उत्तमरीत्या सांभाळली. अजाणावर भाष्य करणारा हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट २४ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम करण मेहरा आणि त्याच्या कुटुंबीयांविरूद्ध गुन्हा दाखल

अभिनेत्री शबाना आझमींना दारूची होम डिलिव्हरी पडली महागात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा