Advertisement

'चलो बुलावा आया है' गाणारे भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं निधन

प्रसिद्ध भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं शुक्रवारी निधन झालं. ते 80 वर्षांचे होते.

'चलो बुलावा आया है' गाणारे भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं निधन
SHARES

प्रसिद्ध भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं शुक्रवारी निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. त्यांनी प्रसिद्ध भजनांसह हिंदी चित्रपटांतही पार्श्वगायन केलं होतं. त्यांनी केवळ शास्त्रीय संगीतानेच नव्हे तर लोक संगीताद्वारेही लोकांची मनं जिंकली.

‘बॉबी’ या चित्रपटातील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ या आणि ‘आशा’ सिनेमातील ‘चलो बुलावा आया है, माताने बुलाया है’ या भजनांमुळे ते घराघरांत पोहोचले होते. ते दीर्घ काळापासून आजारी होते आणि मागील तीन दिवसांपासून दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल होते.

१६ ऑक्टोबर १९४० रोजी अमृतसर इथं चेतराम खरबंदा आणि कैलाश वती यांच्या घरी त्यांचा जन्म झाला होता. त्यांना लहानपणापासून भजन गाण्याची आवड होती. मातारानीची भजन ते लहानपणापासून गात असायचे. त्यांची आई त्यांची पहिली गुरु होती. त्यानंतर त्यांनी प्रेम त्रिखा यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतलं होतं.

बॉलिवूडमधील त्यांचा प्रवास राज कपूर यांच्यासोबत सुरू झाला होता. ‘बॉबी’मधील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ हे गाणे त्यांनी गायले होते. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं होतं. आशा या चित्रपटातील 'चलो बुलावा आया है माताने बुलाया है…' या भजनामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या भजनामुळे ते घराघरात पोहोचले.हेही वाचा

लोकप्रिय महिला स्टार्सच्या यादीत दीपिकानं पटकावलं पहिलं स्थान

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा