कुणी घर देता का घर?

माहीम - 'इतनी शक्ती हमें दे न दाता' हे गाणं तुुम्हा आम्हा सगळ्यांना माहीत असेलच. हे गाणं गायलं होतं ज्येष्ठ पार्श्वगायिका पुष्पा पागधरे यांनी. पुष्पा पागधरे यांच्या या गाण्यानं आजही उर्जा येते..मात्र कुणी घर देता का घर? असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. माहिमधील मच्छिमार कॉलनीत 170 चौ.फुटाच्या खोलीत सध्या त्या मानस भाऊ आणि चुलत बहिणीच्या मुलींसोबत राहतात.

1989 मध्ये पागधरे यांनी कलाकार कोट्यातून घर मिळावे यासाठी अर्ज केला. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पाठपुरावा करून त्यांच्या चपला झिजल्या पण त्यांना घर काही मिळाले नाही. त्यामुळे वयाची 74 वर्षे पार केलेल्या पागधरे अजूनही त्याच जुनाट घरात आयुष्य काढत आहेत.

हिंदी, मराठी, उडिया, बंगाली, पंजाबी भाषांमध्ये 500 हून अधिक गाणी गाणाऱ्या आणि इतनी शक्ती हमे देना दाता या अजरामर गाण्यामुळे घराघरात पोहचलेल्या पागधरे आता मात्र थकल्या आहेत. कलाकार कोटा बंद झाल्याने आता घर मिळेल, ही आशा मावळली आहे. पण त्यातही कलाकारांसाठीचे मानधन वाढवावे आणि वयोवृद्ध कलाकारांचा शेवटचा काळ सुखाचा जावा एवढीच आता त्यांची मागणी आहे.

Loading Comments 

Related News from संगीत आणि नृत्य