Advertisement

‘रिमझिम गिरे सावन’ आणि मंत्रमुग्ध करणारे संगीत


‘रिमझिम गिरे सावन’ आणि मंत्रमुग्ध करणारे संगीत
SHARES

मस्त पाऊस पडतोय आणि अशा वातावरणात गाणी ऐकण्याची मजा काही औरच... 'रिमझिम गिरे सावन...,' 'एक लडकी भिगी भागी सी...,' 'प्यार हुवा एकरार हुवा...' त्यात जर अशी गाणी लागली असतील तर मग काही बघायला नको. पावसाळा आणि गाणी! हाऊ रोमँटिक, हा विचार करून वेगळ्याच विश्वात तुम्ही गेला असाल. मला माहित आहे काहिंच्या पावसाळ्यातल्या आठवणी देखील नक्की जाग्या झाल्या असतील.

बदलत्या काळानुसार पावसात चित्रीत करण्यात येणारे गाणे तसेच संगीत यात अमुलाग्र बदल झाले. असे असतानाही आजही पावसात चित्रीत करण्यात आलेली जुनी गाणी अजरामर आहे. तुम्हाला अशाच गाण्यांचा मनमुराद आनंद घेता येणार आहे.

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील ‘लोकमान्य कट्‌टया’वर २४ जून म्हणजेच रविवारी तुम्हा सर्वांना पावसाच्या जुन्या गाण्यांचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. गाण्यांचे बोल आणि संगीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल्याशिवाय रहात नाही. जोगेश्‍वरी (पूर्व) इथल्या ‘लोकमान्य कट्टा’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘रिमझिम गिरे सावन’ या जुन्या मराठी आणि हिंदी गितांच्या कार्यक्रमात, ‘ये रात भिगी भिगी...’, ‘प्यार हुवा इकरार हुवा...’ ‘डमडम डिगा डिगा..’, ‘मेघा रे मेघा रे...’ तसंच लहान मुलांना भुरळ घालणार्‍या मराठीतील ‘नाच रे मोरा...’ अशी गाणी ऐकून मंत्रमुग्ध व्हाल. ही गाणी कानावर पडताच तुम्हाला ठेका धरायला लावतील.

‘युवा संगीत भुषण’ प्राप्त सागर कांबळी आणि त्यांची टीम ही सर्व सुमधुर गाणी रसिक प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. जोगेश्‍वरी विधानसभेचे आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून या ‘लोकमान्य कट्‌ट्या’ची सुरुवात करण्यात आली. याची धुरा अनिल म्हसकर हे सांभाळत आहेत. दर महिन्याला विविध विषयांवर या कट्‌टयाच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात येतात. यावेळी ते गीतांचा कार्यक्रम घेऊन येत आहेत.

पावसाळा आणि गाणी... किती भारी ना! मग काय? येणार ना जुन्या गितांचा मनमुराद आनंद लुटायला?

कुठे - दत्ताराम गोविंद वायकर स्मृती सभागृह, शामनगर तलाव, जोगेश्वरी

कधी - २४ जून, रविवार

वेळ - संध्याकाळी ६ ते १०



हेही वाचा

ट्रेकिंग करताना 'ही' घ्या काळजी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा