'ब्रिटन्स गॉट टॅलेंट'मध्ये कांदिवलीच्या अक्षतचा जलवा

वर्ल्ड टी. व्ही. वरील सर्वात लोकप्रिय शो ब्रिटन्स गॉट टॅलेंटमध्ये सहभागी होता येणं ही मोठी गोष्ट मानली जाते. अशा शोमध्ये अक्षतनं सहभागी होणं हे खरंच अभिमानास्पद आहे.

  • 'ब्रिटन्स गॉट टॅलेंट'मध्ये कांदिवलीच्या अक्षतचा जलवा
  • 'ब्रिटन्स गॉट टॅलेंट'मध्ये कांदिवलीच्या अक्षतचा जलवा
  • 'ब्रिटन्स गॉट टॅलेंट'मध्ये कांदिवलीच्या अक्षतचा जलवा
  • 'ब्रिटन्स गॉट टॅलेंट'मध्ये कांदिवलीच्या अक्षतचा जलवा
SHARE

मुंबईतील कांदिवलीत राहणारा अक्षत सिंह... अवघ्या १४ वर्षांचा मुलगा... हा छोटू मास्टर नाचायला लागला की त्याच्यासोबत सगळ्यांचीच पावलं थिरकतात... २०१४ साली इंडिया गॉट टॅलेंटमध्ये धुवांधार डान्स सादर करत त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता तर पठ्ठ्यानं एक पायरी पुढे जात परदेशात आपल्या डान्सचा जलवा दाखवला आहे. वर्ल्ड टी. व्ही. वरील सर्वात लोकप्रिय शो ब्रिटन्स गॉट टॅलेंटमध्ये सहभागी होता येणं ही मोठी गोष्ट मानली जाते. अशा शोमध्ये अक्षतनं सहभागी होणं हे खरंच अभिमानास्पद आहे.


'एनीबडी कॅन डान्स'

थुलथुलीत देहाचा अक्षत स्टेजवर आला त्यावेळी अनेकांना प्रश्‍न पडला की तो कसे डान्स कसा करेल? पण स्टेजवर येताच अक्षतनं धम्माल डान्स करत सर्वांची मनं जिंकली. सुरुवातीला त्यानं ‘अग्‍निपथ’मधील ‘देवा श्रीगणेशा’वर नृत्य केले आणि नंतर रॅपर निकी मिनाजच्या ‘स्टार्सहिप्स’ गाण्यावर अफलातून डान्स केला. फक्त डान्सच नाही तर  बोलण्यातून देखील त्यानं प्रेक्षकांच्या आणि परिक्षकांच्या मनावर जादू केली. 'लठ्ठ व्यक्‍तीही सुंदर नाचू शकतात हेच दाखवण्यासाठी आपण आलो आहे,' असं त्यानं नृत्याच्या शेवटी म्हटलं.


'अशक्य असं काही नाही'

डान्स करण्यापूर्वी त्यानं परीक्षकांच्या प्रश्‍नाला उत्तर देत असताना म्हटलं होतं की, आयुष्यात माझे केवळ दोनच हेतू आहेत, पहिले सर्वांना खूश ठेवणं आणि दुसरं कोणतेही काम अशक्य नसतं हे सिद्ध करणं! त्यानंतर त्यानं जो अप्रतिम डान्स केला तो पाहून सायमन कोवेल, डेव्हीड विल्यम्स, एलेशा डिक्सन आणि अमांडा होल्डन हे चारही परीक्षक थक्‍क झाले. त्यांनी उभे राहून त्याचे कौतुक केले आणि त्याला गोल्डन बझरचा मानही दिला.


गोल्डन बजरचा मान 

गोल्डन बझर मान मिळाल्यानंतर अक्षत सेमी फायनल राऊंडमध्ये पोहोचला आहे. येत्या २४ मेला सेमी फायनल राऊंडमध्ये तो आपला डान्स सादर करेल. अक्षतचा धडाकेबाज डान्स तुम्हाला देखील पाहायचा आहे का? अक्षतचा डान्स भारतात फक्त कलर्स इन्फिनिटी या व्यासपीठावर पाहता येईल. जूनमध्ये कलर्स इन्फिनिटीवर 'ब्रिटन्स गॉट टॅलेंट' हा शो पाहता येईल. 


अक्षतचा आतापर्यंतचा प्रवास, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मिळालेलं यश आणि त्याचं स्वप्न यासंदर्भातच 'मुंबई लाइव्ह'नं अक्षतशी बातचीत केली. 

ब्रिटन्स गॉट टॅलेंट या शोमध्ये सहभागी होऊन तू भारताचं नाव उचावलंस. तुला कसा अनुभव आला

ब्रिटन्स गॉट टॅलेंटमध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली यासाठी मी खूप आनंदी आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की ब्रिटन्स गॉट टॅलेंटमध्ये मला भारताचं प्रतिनिधित्व करायला मिळालं. इंडिया गॉट टॅलेंट या शोमधून खऱ्या अर्थानं माझ्या प्रवासाला सुरुवात झाली होती. आज मी ब्रिटन्स गॉट टॅलेंटच्या व्यासपीठावर आहे. दोन्ही व्यासपीठावरील माझा अनुभव खूप चांगला होता

शोमध्ये तु कुठल्या गाण्यावर डान्स सादर केलास? तिन्ही जजेसनी कशी प्रतिक्रिया दिली?

सुरुवातीला 'देवा श्री गणेशा' या गाण्यावर मी डान्स सादर केला. हिंदी गाणं असल्यानं त्यांना समजलं नाही. पण देवावर हे गाणं आहे हे त्यांना कळालं. दुसरा डान्स मी ‘स्टार्सहिप्स’ गाण्यावर केला. माझा डान्स पाहून जजेसना आश्चर्याचा धक्का बसला. मी असा नाचू शकतो यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता. मला नाचताना पाहून ते देखील थिरकायला लागले. सायमन कोवेल यांचा मी मोठा चाहता आहे. त्यांच्या मनात जे असतं ते सरळ बोलतात. त्यांनी देखील माझ्या डान्सचं कौतुक केलं. माझा डान्स जजेसना इतका आवडला की त्यांनी मला गोल्डर बजरनं सन्मानित केलं. गोल्डन बजर मिळाल्यानं मी सरळ सेमी फायनल गाठलं आहे. आता २४ मे रोजी मी पुन्हा ब्रिटन गॉट टॅलेंटच्या व्यासपीठावर डान्स सादर करेन


'ब्रिटन्स गॉट टॅलेंट' शोमध्ये सहभागी होण्यासाठी तु कशा प्रकारची तयारी केलीस?

'ब्रिटन्स गॉट टॅलेंट'ला जाण्यापूर्वी माझ्याकडे फक्त २० दिवस होते. त्यामुळे मी प्रचंड मेहनत घेतली आहे. जिमनॅस्टिक, फिटनेस ट्रेनिंग आणि डान्स याचा अधिक सराव केला. यासाठी मी अमित सर आणि सागर सरांना धन्यवाद बोलू इच्छितो. याशिवाय कांदिवलीची माझी शाळा रायन इंटरनॅशनलचा देखील मी खूप आभारी आहे. माझं कुटुंब आणि मित्र-परिवार यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. त्यामुळे माझ्या यशात या सर्वांचाच मोलाचा वाटा आहे.

तुला डान्सची प्रेरणा कुणाकडून मिळाली?

मी मायकल जॅक्सन यांचा खूप मोठा चाहता आहे. मी डान्सची प्रेरणा त्यांच्याकडूनच घेतली. याशिवाय मी सलमान खानचा देखील मोठा चाहता आहे. मला त्यांचा अभिनय आवडतो. भाईयो का भाई सल्लू भाई... मी सलमान सरांना एकदा भेटलो आहे. त्यांनी देखील माझ्या डान्सचं कौतुक केलं. ते म्हणाले, 'जे काही करशील ते मनानं कर. टेन्शन घेऊ नकोस तर टेन्शन दे.' सो हे दोन कलाकार आहेत ज्यांच्यापासून मी प्रेरीत झालो


शिक्षण आणि डान्स यातील ताळमेळ तू कसा बसवतोस?

मी रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ९व्या इयत्तेत शिकत आहे. मी माझा अभ्यास आणि डान्स या दोन्ही गोष्टी बॅलन्स करतो. मी कुठेही जातो तिकडे माझी पुस्तकं सोबत घेऊन जातो. जसा वेळ मिळेल तसा मी अभ्यास करतो. माझे आई-बाबा यात माझी खूप मदत करतात. मी जे काही करतो ते मनापासून करतो. मनापासून खातो, अभ्यास करतो आणि डान्सही करतो. तिन्ही गोष्टी मी खूप चांगल्या प्रकारे हाताळतो.  

'मुंबई लाइव्ह'च्या वाचकांना तू काय संदेश देऊ इच्छितोस?

तुम्ही लहान आहात, मोठे आहात किंवा जाडे आहात, यामुळे काही फरक नाही पडत. लठ्ठ व्यक्‍तीही सुंदर नाचू शकतात हेच दाखवण्यासाठी मी ब्रिटन गॉट टॅलेंटमध्ये आलो. तुम्ही कसं दिसता याला महत्त्व नाही. तुम्ही कसा डान्स करता आणि किती मेहनत घेता याला महत्त्व आहे. फक्त जे काही करता ते मनापासून केलं पाहिजे. ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनती आणि अधिक फोकस राहिलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आपला देश, आई-बाबा आणि शाळेचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे.   


भविष्यात तुला काय करायला आवडेल?

मला आंतरराष्ट्रीय स्थरावर भारताचं नाव उंचवायचं आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये लेजंड आहे तसंच मला देखील डान्समध्ये लेजंड बनायचं आहे. आयुष्यात माझे केवळ दोनच हेतू आहेत, पहिले सर्वांना खूश ठेवणं आणि दुसरं कोणतेही काम अशक्य नसतं हे सिद्ध करणं!


अक्षतनं 'इंडिया गॉट टॅलेंट'मधून आपला प्रवास सुरू केला होता. त्यानंतर त्यानं झलक दिखला जा या शोमध्ये सहभाग घेतला होता. तो अनेक शोज करत असतो. तमिळ चित्रपटात देखील त्यानं अभिनय केला आहे. अक्षतने यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. 'द अॅलन' शोमध्ये देखील अक्षत झळकला होता. आता ब्रिटन गॉट टॅलेंटमध्ये तो आपला डान्सचा जलवा दाखवत आहे. हेही वाचा -

अमेरिकेतल्या लोकप्रिय डान्स शो चे 'किंग्स' ठरली मुंबईची पोरं!
संबंधित विषय
ताज्या बातम्या