Advertisement

सावनीचा 'लताशा' आता हिंदीत

गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल म्हणजे 'लताशा'. लता आणि आशा यांच्या नावांचा संगम करून 'लताशा' हे गोड टायटल ठेवण्यात आलं आहे. मागील पाच वर्षांपासून सावनी हा कार्यक्रम अविरतपणे सादर करत आहे.

सावनीचा 'लताशा' आता हिंदीत
SHARES

आजच्या मराठी गायकांच्या फळीतील आघाडीचं नाव म्हणजे गायिका सावनी रवींद्र. सावनीनं आपल्या सुमधूर गायकीनं संगीतप्रेमींच्या मनात घर करणाऱ्या सावनीचा 'लताशा' हा कार्यक्रम आता हिंदीतही सादर केला जाणार आहे.


पाच वर्षांपासून अविरतपणे 

गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल म्हणजे 'लताशा'. लता आणि आशा यांच्या नावांचा संगम करून 'लताशा' हे गोड टायटल ठेवण्यात आलं आहे. मागील पाच वर्षांपासून सावनी हा कार्यक्रम अविरतपणे सादर करत आहे. अवीट गोडीची मराठी गीतं या कार्यक्रमातून कानसेनांना ऐकायला मिळत असतात. आता पाच यशस्वी वर्षांनंतर लोकाग्रहास्तव सावनी ही कन्सर्ट हिंदीमधून घेऊन आली आहे.


हृदयनाथही हजेरी लावतात

सावनीचा मंगेशकर कुटुंबीयांशी खूप पूर्वीपासून ऋणानुबंध आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर हे तिचे गुरू आहेत. त्यामुळं लतादीदी आणि आशाताईंची गाणी आणि त्यांचा अंदाज जणू सावनीच्या रक्तातच भिनला आहे. 'लताशा' मराठी कॉन्सर्ट्सना बऱ्याचदा पं. हृदयनाथ मंगेशकरही हजेरी लावतात. त्यामुळंच 'लताशा' हा कार्यक्रम कानसेनांसाठी जणू पर्वणीच ठरतो.


२६ एप्रिलला कार्यक्रम

मराठीत गाजलेला 'लताशा' हिंदीत आणण्याबाबत सावनी म्हणाली की, मागील पाच वर्षे 'लताशा' मराठीत करताना, अनेकजण मला लतादीदी आणि आशाताईंच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम करावा, अशी मागणी करत होते. मग बाबा (पं. हृदयनाथ मंगेशकर ) यांच्या परवानगीनं आणि त्यांच्या आशिर्वादानं मी हिंदी कार्यक्रम सुरू करायचं ठरवलं. पहिले दोन कार्यक्रम पुण्यात केले. तिथल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर मुंबईतल्या रसिकांसमोर कार्यक्रम सादर करायचा आत्मविश्वास वाढला आहे. २६ एप्रिलला दिनानाथ मंगेशकर सभागृहात हा कार्यक्रम आम्ही करणार आहोत.


लतादीदी, आशाताईंची गाणी

या कार्यक्रमाची खासियत म्हणजे सावनी हा कार्यक्रम २० वादकांच्या संचासह सादर करत आहे. या कार्यक्रमात लतादीदी आणि आशाताईंनी गायलेली भक्तीगीतांपासून अगदी कॅब्रेपर्यंतची गाणी आणि त्यांचे किस्से रसिकांना ऐकायला मिळतील.



हेही वाचा -

विकी कौशलसोबत रिंकूला जायचंय डेटवर!

मराठी चित्रपटसृष्टीत गटबाजी; वर्षा उसगावकरांचा आरोप




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा