Advertisement

शिवराज्याभिषेक दिनी त्यागराज जागवणार 'महाराष्ट्राचा गौरव'

आपण आजवर जे पाहिलं ते गीतातून व्यक्त करण्याच्या हेतूनं गायक-संगीतकार-अभिनेता त्यागराज खाडीलकरनं महाराष्ट्र गौरव गीत बनवलं आहे. या गीताच्या निमित्तानं मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांनीही महाराष्ट्राचं गुणगान गायलं आहे.

शिवराज्याभिषेक दिनी त्यागराज जागवणार 'महाराष्ट्राचा गौरव'
SHARES

आपण आजवर जे पाहिलं ते गीतातून व्यक्त करण्याच्या हेतूनं गायक-संगीतकार-अभिनेता त्यागराज खाडीलकरनं महाराष्ट्र गौरव गीत बनवलं आहे. या गीताच्या निमित्तानं मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांनीही महाराष्ट्राचं गुणगान गायलं आहे.


 

महाराष्ट्राच्या जनतेला अर्पण

बालपणापासूनच अभिनय आणि गायन करणाऱ्या त्यागराजनं नेहमीच काहीतरी वेगळं आणि नावीन्यपूर्ण करण्यावर भर दिला आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'वेडींगचा शिनेमा' या चित्रपटात त्यागराजनं साकारलेल्या कोरिओग्राफर जम्बोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर त्यागराज आता महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात अभिमान जागवणारं महाराष्ट्र गौरव गीत घेऊन आला आहे. ६ मार्च रोजी शिवराज्याभिषेक दिनाच्या या मुहूर्तावर हे गीत महाराष्ट्राच्या तमाम जनतेला अर्पण करण्यात येणार असल्याचं त्यागराजनं 'मुंबई लाइव्ह'शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना सांगितलं.


गीताद्वारे महाराष्ट्राचं सौंदर्य 

झी म्युझिक कंपनीची प्रस्तुती असलेलं 'महाराष्ट्र माझा, गगनी घुमला जयजयकार...' असे बोल असलेलं हे महाराष्ट्र गौरव गीत पुण्यातील नाटककार ऋषिकेश परांजपे यांनी लिहिलं आहे. परांजपे यांचं वैशिष्ट्य म्हणजे  दादा कोंडके यांच्या शेवटच्या काळातील चित्रपटांचं लेखन त्यांनी केलं आहे. या गीताच्या संकल्पनेबाबत सांगताना त्यागराज म्हणाला की, महाराष्ट्र गौरव गीत बनवायचं हा विचार मागील तीन-चार वर्षांपासून माझ्या मनात घोळत होता. एक दिवस परांजपे यांची भेट झाली आणि त्यांना हा विचार बोलून दाखवला. त्यांनी तत्परतेनं त्यावर गीतलेखन केलं. बालपणापासून नाटकांच्या दौऱ्यांच्या निमित्तानं महाराष्ट्रातील लहानात लहान खेडी पाहिली आहेत. तिथली संस्कृती, परंपरा, विविधता अनुभवली आहे. त्यामुळंच विविधततेतही एकात्मकतेनं नटलेलं महाराष्ट्राचं सौंदर्य गीताद्वारे जगासमोर मांडावं असं वाटलं.


ठसकेबाज लावणी

त्यागराजनंच हे गीत गायलं असून, दिग्दर्शन व संगीत दिग्दर्शनही केलं आहे. या गीतात महाराष्ट्राच्या लोक परंपरेसह, देवी-देवता, संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा यांचं दर्शन घडतं. ढोल-ताशांच्या तालावर नाचणारे नर्तक, हाती भगवा घेऊन उंचावणारा त्यागराज आणि त्या जोडीला श्रेयस तळपदेसह मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांचा परफॅार्मंस या गीतात पहायला मिळतो. मेघा घाडगेच्या ठसकेबाज लावणीचा ठेका आणि प्रांतानुरूप बदलणाऱ्या भाषेसोबतच बदलणाऱ्या बोलीभाषेचंही वर्णन यात आहे. याशिवाय प्रत्येक विभागातील वैशिष्ट्यांचा समावेशही या गीतात करण्यात आला आहे.


चित्रीकरण कर्जतमध्ये 

त्यागराजच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या महाराष्ट्र गौरव गीतामध्ये श्रेयस तळपदेसह अलका कुबल, प्रिया बेर्डे, सिद्धार्थ जाधव, मेघा घाडगे, संजय खापरे, जयवंत आणि विद्या वाडकर, विजय पाटकर, मेघराज राजे भोसले या कलाकारांसह उदय साटम डान्स ग्रुप, स्टुडंट आॅफ गीता इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत, नेताजी पालकर विद्यालय चौक-रायगड या संस्थांमधील विद्यार्थ्यांनीही परफॅार्म केलं आहे. या गीताचं चित्रीकरण दादर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक आणि कर्जत येथे करण्यात आलं आहे.



हेही वाचा-

EXCLUSIVE : शनाया बनली स्कूबा डायव्हर

... तर 'बिग बॉस'च सर्वांना करतील नॉमिनेट?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा