Advertisement

रोहित-हृषिकेश-आनंदीचा ‘चोरीचा मामला’!

रोहन सातघरे यांनी ‘एक होतं पाणी’चं दिग्दर्शन केलं आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवलं पाहिजे, असा मोलाचा संदेश हा चित्रपट सर्वदूर पोहोचवणार आहे.

रोहित-हृषिकेश-आनंदीचा ‘चोरीचा मामला’!
SHARES

मराठी सिनेमांमध्ये नेहमीच वेगवेगळे सामाजिक विषय हाताळले जात असतात. अशाच एका सामाजिक विषयावर आधारित असणारा ‘एक होतं पाणी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील एक खट्याळ गाणं नुकतंच रेकॅार्ड करण्यात आलं.दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट 

न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत निर्मिती होणाऱ्या या सिनेमातील एका गाण्याचं रेकॉर्डिंग नुकतंच कैलास स्टुडिओमध्ये पार पडलं. ‘एक होतं पाणी’ हा चित्रपट पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणारा असल्याचं शीर्षकावरून सहज लक्षात येतं. त्यानुसार हा चित्रपटही एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट सांगणारा आहे. 


बघायची झाली चोरी

या चित्रपटातील ‘भान राहील ना गं पोरी, तुला बघायची झाली चोरी...’ हे आशिष निनगुरकरने लिहिलेलं गीत रोहित राऊत, हृषीकेश रानडे आणि आनंदी जोशी या मराठी संगीत क्षेत्रातील सध्याच्या आघाडीच्या गायकांच्या आवाजात रेकॅार्ड करण्यात आलं आहे. विकास जोशी यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे.


पाण्याचं संकट

रोहन सातघरे यांनी ‘एक होतं पाणी’चं दिग्दर्शन केलं आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवलं पाहिजे, असा मोलाचा संदेश हा चित्रपट सर्वदूर पोहोचवणार आहे. विजय तिवारी व डॉ. प्रविण भुजबळ हे सिनेमाचे निर्माते आहेत. गीतकार आशिष निनगुरकरनेच या सिनेमाचं लेखनही केलं आहे. दिवसेंदिवस पाण्याचं संकट भीषण रूप धारण करत आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा योग्य वापर केला गेला नाही, तर हे संकट आणखी गहिरं होण्याची दाट शक्यता आहे. हाच मुद्दा या चित्रपटाद्वारे अधोरेखित करण्यात आला आहे.

छायालेखन अंधारेंचं

हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ. राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदी कलाकारांच्या भूमिका या सिनेमात आहेत. डीओपी योगेश अंधारे यांनी ‘एक होतं पाणी’चं छायालेखन केलं आहे.हेही वाचा -

नाकातून गात मुग्धा कऱ्हाडेने केली ‘तोडफोड...’

कलाकारांच्या आवाजात अवतरली ‘चंद्रमुखी...’!
संबंधित विषय
Advertisement