Advertisement

रसिक दरबारी ‘स्वामी त्रैलोक्याचा’

अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ यांचे भक्तगण जगभर पसरले आहेत. या भक्तगणांच्या सेवेत ‘स्वामी त्रैलोक्याचा’ ही नवी ध्वनीफीत सादर करण्यात आली आहे.

रसिक दरबारी ‘स्वामी त्रैलोक्याचा’
SHARES

देवादिकांप्रमाणंच साधूसंतांची भक्ती करणारा फार मोठा भक्त वर्ग जगभरात आहे. ‘साधू थोर जाणा कलियुगी’ या संतवचनांप्रमाणं अनेक जण संतांची भक्ती करतात. यात अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ यांचे भक्तगण जगभर पसरले आहेत. या भक्तगणांच्या सेवेत ‘स्वामी त्रैलोक्याचा’ ही नवी ध्वनीफीत सादर करण्यात आली आहे.


अनावरण सोहळा संपन्न

‘अशक्यही शक्य करतील स्वामी’ हे वाक्य नुसतं उच्चारलं तरी जगण्याला नवी ऊर्जा मिळते. श्री स्वामी समर्थांचा अवतारच मानवी जीवनाच्या कल्याणासाठी संकटमुक्तीसाठी आहे. स्वामी समर्थांचा महिमा, त्यांचं कार्य आणि कीर्ती भक्तिगीतांच्या माध्यमातून भक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘स्वामी त्रैलोक्याचा’ ही नवीन संगीत ध्वनीफीत स्वामींच्या भक्तांसाठी उपलब्ध झाली असून, या ध्वनिफीतीचा अनावरण सोहळा नुकताच दादर येथील स्वामी समर्थ मठात संपन्न झाला.


नामवंत गायकांचा स्वरसाज

वैजयंती परब लिखित ‘स्वामी त्रैलोक्याचा’ या ध्वनिफीतीमधील गाण्यांना नामवंत गायकांनी स्वरसाज चढवला आहे. यात पद्मश्री अनुप जलोटा, पद्मश्री अनुराधा पौडवाल, अजित कडकडे, रविंद्र साठे, वैशाली सामंत आणि आर्या आंबेकर या गायकांचा समावेश आहे. संगीतकार स्वरूप नंदू होनप यांनी ही गीतं संगीतबद्ध केली आहेत. या ध्वनिफीतीसाठी गाताना वेगळा आनंदानुभव मिळाल्याचं सांगत ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांनी ‘स्वामी त्रैलोक्याचा’ला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.


हिंदी–मराठी गाण्यांचा नजराणा

या ध्वनीफीतीची निर्मिती वैजयंती परब यांनी केली आहे. ‘भावानुभव’ व ‘भावांजली’ या काव्यसंग्रहातील भक्तीगीतं स्वामी भक्तांपर्यंत पोहचावीत यासाठी या ध्वनिफीतीची निर्मिती केल्याचे परब यांचं म्हणणं आहे. या ध्वनिफीतीच्या निमित्तानं स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाल्याचं समाधान संगीतकार स्वरूप नंदू होनप यांनी व्यक्त केलं. ‘माता पिता बंधू सखा…’, ’अंतरंग रंगले माझे…’, ‘स्वामीमय झाले मन…’, ‘स्वामी के दरबार में…’, ‘तेरी क्रिपा होगी…’, ‘तुझे रूप चित्ती…’, ‘स्वामी पाके तेरे दरसन…’, ‘जय देव जय देव अक्कलकोट स्वामी…’ या हिंदी–मराठी गाण्यांचा नजराणा या ध्वनिफीतीत आहे.



हेही वाचा - 

माधुरी पवार बनली महाराष्ट्राची पहिली अप्सरा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा