• मोहम्मद रफी यांच्या स्मृतीशिल्पाचं अनावरण
  • मोहम्मद रफी यांच्या स्मृतीशिल्पाचं अनावरण
SHARE

वांद्रे - गायक मोहम्मद रफी यांच्या 92 जयंतीनिमित्त शनिवारी 24 डिसेंबरला त्यांच्या स्मृतीशिल्पाचं अनावरण करण्यात आलं. वांद्रे येथील लकी हॉटेलसमोर मोहम्मद रफी चौकात मोहम्मद रफी यांचे खास स्मृतीशिल्प महापालिकेच्या निधीतून उभारण्यात आलं. मुंबईचे भाजपाध्यक्ष आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या प्रयत्नाने हे स्मृतीशिल्प उभारलं. या वेळी आमदार आशिष शेलार यांच्यासह उपमहापौर अलका केरकर, महापालिका उपायुक्त वसंत प्रभू आणि सह आयुक्त शरद उगाडे आणि रफी कुटुंबीय यांच्यासह रफी चाहते उपस्थित होते.

रफी यांच्या आवाजात अशी जादू होती की त्यांनी सर्व जाती-धर्माची माणसं आपल्या सुरांनी जोडली. हा देश आणि देशाबाहेरील संगीतप्रेमींना रफींनी सुरांनी जोडेलं, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या