दहिसर : जुने नारळाचे झाड पडून एकाचा मृत्यू झालाय. बँक ऑफ इंडिया वसाहत कंपाऊंड परिसरातली ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहिसरच्या पूर्वेकडे गोकुलानंद हॉटेलजवळ असलेल्या सर्व्हिस रोडच्या किनारी अनेक बेरोजगार झोपड्या बांधून राहत आहेत. याला लागून असलेल्या वसाहतीत नारळाची अनेक जुनी झाडे आहेत. रविवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक झाड झोपडीवर पडले. त्यामुळे तिथे राहणारे रामनिवास यादव गंभीर जखमी झाले. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.