Advertisement

अमेरिकेच्या जवळ जायची मोदींना घाई- भाई वैद्य


अमेरिकेच्या जवळ जायची मोदींना घाई- भाई वैद्य
SHARES

मोदींना अमेरिकेच्या जवळ जायची अती घाई झाल्याची टीका माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांनी रविवारी केली. कॉ. गुलाबराव गणाचार्य जन्मशताब्दी वर्ष 2017-18 च्या निमित्ताने रविवार 21 मे रोजी दादरच्या सावरकर सभागृहात 'गुलाब पुष्प' या स्मृती ग्रंथाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भाई वैद्य यांनी भूषवले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, माजी मंत्री आणि खासदार हुसेन दलवाई, कॉ. भालचंद्र कांगो (भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र- सचिव), डॉ. भारत पाटणकर (श्रमिक मुक्ती दल), राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या चित्रा वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतात साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या करतात. त्यामुळे या देशाचं काय होणार? सध्या यशवंतराव चव्हाण यांचे कृषी उद्योग धोरण अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. सोशालिस्ट आणि कम्युनिस्ट पार्टीने एकत्र येऊन हा लढा सुरू ठेवला तर मुंबईमध्ये कामगार वर्ग टिकेल. कामगार संपले, कामगार संघटना संपल्या असं म्हणून फक्त भागणार नाही तर त्या मागची कारणे शोधून त्यावर पर्याय काढणे आवश्यक आहे असं कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई वैद्य यावेळी म्हणाले.

जेव्हा गिरण्या होत्या तेव्हा अडीच लाख गिरणी कामगार होते. त्यांच्या कुटुंबात त्यांच्यावर अवलंबून असलेली 12 लाख लोकं होती. सध्या त्यापैकी काहीच राहिले नाही. ती कुटुंबं देखील विस्कळीत झाली. सरकारला कधीकधी मध्येच झटके येतात आणि आम्ही गिरणी कामगारांना घरे देऊ अशा घोषणा केल्या जातात. पूर्वी मुंबई कामगार नगरी होती आता स्टॉक एक्स्चेंजचॆ मार्केट झाली आहे असं मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी यावेळी मांडलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा