Advertisement

पोलिसांचे १४३२ बुलेटप्रूफ जॅकेट्स निकृष्ट

कंपनीकडून पुरवण्यात आलेल्या बुलेटप्रुफ जॅकेट्सची एके ४७ मशीनगनच्या फैरीद्वारे चाचणी घेतली असता, त्यात १४३२ जॅकेट् निकृष्ट असल्याचं आढळून आलं. हे जॅकेट्स कंपनीला परत पाठवून उरलेले ३१२२ जॅकेट्स पोलिस दलाला वाटण्यात आले आहेत.

पोलिसांचे १४३२ बुलेटप्रूफ जॅकेट्स निकृष्ट
SHARES

महाराष्ट्र पोलिस दलासाठी बुलेट प्रतिरोधक (बुलेटप्रूफ) जॅकेट पुरविण्याबाबत सर्व निकष व प्रक्रियांचं पालन करूनच जॅकेटचा पुरवठा करण्याचे आदेश कानपूर येथील एम. के. यू. प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांनी पुरवलेल्या जॅकेटपैकी १४३२ जॅकेट्स निकृष्ट दर्जाचे ठरल्याने त्यांना परत पाठवण्यात आलं आहे. यासंदर्भात आ. सरदार तारासिंग यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


इ-निविदेद्वारे काम

राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने ५ हजार बुलेटप्रुफ जॅकेट्सची इ-निविदा काढली होती. त्यात पात्र ठरलेल्या एम. के. यू. कंपनीला जॅकेटचा पुरवठा आदेश दिले. या जॅकेट्सची तपासणी केंद्र सरकारच्या चंदीगड येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा या एकमेव प्रयोगशाळेत करण्यात येत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिली.


किती जॅकेट्सचा पुरवठा?

पोलिस दलाला बुलेटप्रुफ जॅकेटचा तात्काळ पुरवठा करणं आवश्यक असल्याने सीमा शुल्काची रक्कम समाविष्ट करुन ५ हजार ऐवजी ४ हजार ६१४ जॅकेट्सचा पुरवठा करण्याचे सुधारित आदेश कंपनीला देण्यात आले होते. त्यानुसार कंपनीने ४ हजार ६१४ जॅकेटचा पुरवठा केल्याचं त्यांनी सांगितलं.


चाचणीत दोषी

कंपनीकडून पुरवण्यात आलेल्या बुलेटप्रुफ जॅकेट्सची एके ४७ मशीनगनच्या फैरीद्वारे चाचणी घेतली असता, त्यात १४३२ जॅकेट् निकृष्ट असल्याचं आढळून आलं. हे जॅकेट्स कंपनीला परत पाठवून उरलेले ३१२२ जॅकेट्स पोलिस दलाला वाटण्यात आले आहेत.

या कंपनीकडून नवीन जॅकेट्स आल्यावर त्यांची पुन्हा चाचणी होईल, त्यानंतरच ते पोलिस दलाला वाटप करण्यात येतील, असंही पाटील म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा