महापालिका सभागृहात १५५ नवीन चेहरे

  Mumbai
  महापालिका सभागृहात १५५ नवीन चेहरे
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महापालिकेच्या सभागृहात यावेळी नवीन नगरसेवकांचे आगमन होणार आहे. महापालिकेच्या या निवडणुकीत थोडे थोडके नव्हे तर तब्बल १५५ नवीन नगरसेवक निवडून आले आहेत. या १५५ अननुभवी नगरसेवकांच्या जोरावरच महापालिकेच्या कारभाराचा गाढा हाकावा लागणार असून, आता या सभागृहातील ७२ आजी व माजी नगरसेवक आपल्या अनुभवाच्या जोरावर कशाप्रकारे प्रशासनाला पुरुन उरतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
  मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यंदा मोठ्याप्रमाणात नवीन चेहरे निवडून आले आहेत. मुंबईकरांनी या नव्या चेहऱ्यांवर आपला विश्वास टाकून शहाराच्या पायाभूत सेवा सुविधा पुरवण्याची जबाबदारी टाकली आहे. मुंबईतील २२७ नगरसेवकांपैकी तब्बल १५५ नगरसेवक हे प्रथमच महापालिकेत निवडून आले आहेत. यामध्ये तेजस्वी घोसाळकर, संजय घाडी, श्वेता कोरगावकर, संगिता शर्मा, दीपक ठाकूर, पराग शहा, श्रीकला पिल्ले, अमेय घोले, समाधान सरवणकर, अल्पा जाधव, नील सोमय्या, मनिषा रहाटे, निधी शिंदे, अंजली नाईक, नादीया शेख, वैशाली शेवाळे, सन्वी तांडेल, सुफियान वणू, सुप्रिया मोरे, सोनम जामतसुतकर, आकाश पुरोहित, हषिर्ता नार्वेकर आदी नवोदित नगरसेवक आहेत. तर या सभागृहात आजी आणि माजी असे एकूण केवळ ७२ नगरसेवक असतील. यामध्ये श्रद्धा जाधव, राम बारोट, किशोरी पेडणेकर, विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर, मनोज कोटक, प्रकाश गंगाधरे, उज्ज्वला मोडक, ज्योती अळवणी,शीतल म्हात्रे, या आजी व माजी नगरसेवकांच्या अनुभवाच्या जोरावरच आता महापालिका सभागृहाचा कारभार हाकला जाणार असून, नवोदित नगरसेवकांपैकी कोणता नगरसेवक या महापालिकेत आपली वेगळी छाप निर्माण करतो, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

  २० माजी नगरसेवक पुन्हा सभागृहात

  मुंबई महापालिकेच्या निवडणूक रिंगणात यावेळी तब्बल ६० हुन अधिक माजी नगरसेवक उतरले होते. परंतु प्रत्यक्षात २० माजी नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे ४० हून अधिक माजी नगरसेवकांचे पुन्हा नगरसेवक बनण्याचे स्वप्न भंग पावले आहे. या निवडणुकीत शिवसेना पक्षातून २६ माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली होती. त्याखालोखाल काँग्रेस २०, भाजपा ५, मनसे ३, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि समाजवादी पक्ष १ आदी माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात उतरले होते. परंतु प्रत्यक्षात शिवसेनेच्या राजूल पटेल, शुभदा गुडेकर, चित्रा सांगळे, संजय अगलदरे, मंगेश सातमकर, सुजाता पाटेकर, सुवर्णा करंजे, विश्वनाथ महाडेश्वर, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, आशिष चेंबूरकर, यशवंत जाधव, सुवर्णा करंजे तर काँग्रेसचे विठ्ठल लोकरे, जगदीश अमीन कुट्टी, आशा कोपरकर, रावीराजा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परमेश्वर कदम, भाजपाचे प्रभाकर शिंदे, दक्षा शाह आदी माजी नगरसेवक निवडून आले आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.