Advertisement

विधानसभेसाठी मुंबईत काँग्रेसकडून १८६ जण इच्छुक

विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळण्यासाठी मुंबईमध्ये कॉंग्रेसमधून १८६ इच्छुक असून उमेदवारीसाठी अर्ज केला आहे.

विधानसभेसाठी मुंबईत काँग्रेसकडून १८६ जण इच्छुक
SHARES

राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असून सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकारी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अनेक नेत्यांचे विविध पक्षात पक्षप्रवेश सुरू आहेत. भाजप-शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद यात्रा काढत आहेत. अशातच आता विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळण्यासाठी मुंबईमध्ये काँग्रेसकडून १८६  जण इच्छुक आहेत. या इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केल्याची माहिती समोर येत आहे.

उमेदवारांची मुलाखत

अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मुलाखत पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील आदी नेते उपस्थित होते. या १८६ उमेदवरांची मुलाखत घेतली असली तरी अद्याप कोणत्याही अर्जदाराचं नाव निश्चित करण्यात आलेलं नाही. तसंच प्रदेश काँग्रेस या नावांची यादी हायकमांडकडं पाठवणार आहे. मात्र, अद्याप जागावाटपांवर कोणतीही चर्चा झालेली नाही. 

पक्षाला धक्का?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. अजूनही काही नेते प्रवेशासाठी पक्षांच्या संपर्कात असल्याचं समजतं. त्याचप्रमाणं अनेक नेते विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला धक्का देण्याची शक्यता आहे.हेही वाचा -

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दणका, दंडाच्या रकमेत वाढ

पूल बंदीमुळं बाप्पांच्या अगमनात अडथळे येण्याची शक्यताRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा