भाजपमध्ये इनकमिंग

 Dindoshi
भाजपमध्ये इनकमिंग

दिंडोशी- आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. भाजप नेते मोहित कंबोज नेतृत्व करत असलेल्या दिंडोशी मतदारसंघात 200 सभासदांनी भाजपमध्ये प्रवेश केला.संकेत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया पार पडली. शिवाजीनगर वॉर्ड क्र.34 मधील हे सभासद आहेत. ओम गांगेश्वर वेल्फेअर सोसायटी, नवमित्र चाळ कमिटी, श्री गांगेश्वर चाळ कमिटी, मुडी मित्र मंडळ येथील सभासदांचा समावेश आहे.

Loading Comments