2016 नं घेतली भाजपाची अग्निपरीक्षा

Mumbai  -  

मुंबई - हर हर मोदी...घर घर मोदी.. छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ असे नारे देत केंद्रासह-राज्यात भाजपा सत्तेवर आला. त्याला आता दोन वर्ष झालीत. मात्र या दोन वर्षांत भाजपासाठी महत्त्वाचं ठरलं ते 2016 वर्ष. कारण या वर्षात भाजपाच्या काही बड्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. काहींना या आरोपांमधून क्लीनचीटही मिळाली. पण भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देणाऱ्या भाजपालाही भ्रष्टाचाराच्या आरोपांचं ग्रहण या वर्षी लागलं. या आरोपांनंतरही वर्षाच्या शेवटी भाजपानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निर्विवाद यश मिळवलं. महाराष्ट्रात नंबर वनचं स्थान पटकावणाऱ्या भाजपानं ही अग्निपरीक्षा यशस्वी केली, असंच म्हणावं लागेल.

Loading Comments