काँग्रेसला खिंडार, 3 नगरसेवक मनसेत

  Shivaji Park
  काँग्रेसला खिंडार, 3 नगरसेवक मनसेत
  मुंबई  -  

  दादर - उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जरी संपली असली तरी पक्षांमध्ये इनकमिंग- आऊटगोईंग सुरूच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते नितीन सरदेसाई यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी रविवारी कृष्णकुंजमध्ये 250 ते 300 कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केला.

  यामध्ये कळवा मुंब्रा विभागाचे काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेश खारकर, माजी नगरसेवक सुभाष खारकर, माजी नगरसेवक हेमंत खारकर यांचा समावेश आहे. हे तीनही नगरसेवक अनेक वर्षात काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले कळवा मुंब्रा विभागाचे असून या निवडणुकीत संधी दिली नाही म्हणून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

  तर, विटावा विभागामधून या निवडणूकीत काँग्रेसकडून संधी न मिळाल्यामुळे आणि ठाण्याच्या वागळे इस्टेट मधील जितेंद्र आव्हाडांचे नीकटवर्तीय असलेल्या सुरेंद्र उपाध्याय यांना राष्ट्रवादीकडून संधी देण्यात आल्यामुळे मी नाराज होऊन पक्ष सोडला आणि मनसेत प्रवेश करत असल्याचं मत राजेश खारकर यांनी या वेळी व्यक्त केलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.