Advertisement

मुंबईतील ३६ जागांसाठी ३३३ उमेदवार रिंगणात


मुंबईतील ३६ जागांसाठी ३३३ उमेदवार रिंगणात
SHARES
Advertisement

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील ३६ जागांसाठी ३३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. या दिवशी उपनगरातून ३५ उमेदवारांनी, तर शहरातून ५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

मुंबई शहर जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३३३ उमेदवारांपैकी २४४ उमेदवार हे उपनगरातील २६ जागांवर निवडणूक लढवत असून ८९ उमेदवार शहरातील १० जागांवर लढत देणार आहेत. बोरिवली आणि वांद्रे पश्चिममध्ये केवळ ४ उमेदवार निवडणुकीच्या शर्यतीत आहेत. तर चांदिवली आणि अणुशक्तीनगर मतदारसंघातून सर्वाधिक उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात प्रत्येकी १५ उमेदवार आहेत.

‘असे’ आहेत उमेदवार

सायन कोळावाडा विधानसभा उमेदवार ११-११ उमेदवार, वडाळ्यात ६, माहीममध्ये ४, वरळीतून १३, शिवडीतून ४, भायखळ्यातून ११, मलबार हिलमधून १०, मुंबादेवीतून १२ आणि कुलाबा मतदारसंघातून ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

सोबतच उपनगरातील बोरीवली मतदारसंघातून ४, दहिसरमधून ८, मागाठाणेतून ९, मुलुंडमधून १३, विक्रोळीतून ९, भांडुप पश्चिममधून ७, जोगेश्वरी पूर्वेकडून ७, दिंडोशीतून १०, कांदिवली पूर्वेकडून ६, चारकोपमधून ७, मालाड पश्चिममधून ११, गोरेगावमधून ९, वर्सोव्यातून ९, अंधेरी पश्चिममधून ८, अंधेरी पूर्वेतून ८, विलेपार्लेतून ६, चांदीवलीतून १५, घाटकोपर पश्चिममधून १३, घाटकोपर पूर्वेतून ११, मानखुर्द शिवाजीनगरमधून १०, अणुशक्तिनगरमधून १५, चेंबूरमधून १२, कुर्लातून ६, कालिनातून १४, वांद्रे पूर्वमधून १३ आणि वांद्रे पश्चिममधून ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

२१ आॅक्टोबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत पश्चिम आणि पूर्व उपनगरातून ७२ लाख २६ हजार ८२६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हेही वाचा-

मुंबईतील मतदारांची संख्या वाढली, सर्वाधिक मतदार 'या' मतदारसंघात

महायुतीला ३० जागांवर बसणार बंडखोरांचा फटका?संबंधित विषय
Advertisement