हमारा स्टेशन, हमारी शान

vile parle
हमारा स्टेशन, हमारी शान
हमारा स्टेशन, हमारी शान
See all
मुंबई  -  

विलेपार्ले - रेल्वे स्थानक म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येते ती अस्वच्छता, कळकटपणा. पण हे चित्र आता बदलणार आहे. यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला आहे. सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चगेट ते दहिसर आणि मस्जिद बंदर ते ठाणे अशी ३६ रेल्वे स्थानके रंगीत चित्रे काढून स्वच्छ व सुशोभित करण्यात येणार आहेत.

रविवारी गांधी जयंती दिनी या उपक्रमाची सुरवात विलेपार्ले स्थानकापासून सुरू करण्यात आली. प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी ढोल-ताशा पथकाचे देखील आयोजन केले गेले. हा उपक्रम 8 अॉक्टोबर 2016 पर्यंत राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात सभासद म्हणून नोंदणी करण्यासाठी (9820145268) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.