Advertisement

पुनर्रचना मुस्लिम उमेदवारांना फायद्याची


पुनर्रचना मुस्लिम उमेदवारांना फायद्याची
SHARES

मस्जिद बंदर - प्रभाग पुनर्रचनेत बी विभागातील तीन प्रभागांपैकी एका प्रभागातील 6 बुथ वगळण्य़ात आले आहेत. त्यामुळे बहुतांश मराठी मते ए विभागात सामील झाले आहेत. या बदलात अनेक मराठी मते ए विभागात गेल्याने बी विभागातील मुस्लिम उमेदवारांना फायदा होणार आहे.
सध्या 221, 222 व 223 हे प्रभाग बी विभागात असून, त्यातील 222, 223 हे प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव झाला अाहे. खरंतर साबुसिद्धिक रोड ते रमाबाई आंबेडकर रोडदरम्यान अनेक मराठी आणि दलित वर्ग आहे. त्यामुळे अनेक मराठी मतदार ए विभागात गेल्याने बी विभागात अनेक मुस्लिमांची मते वाढली अाहेत. त्यामुळे अमीन पटेल, बशीर पटेल, जावेद जुनेजा, वखार उन्नीस यांना फायदा होण्याची शक्यता आहे. काळबादेवी व मस्जिद बाजार पेठ जवळच्या भागात अनेक गुजराती समाज आहे. त्यामुळे भाजप उमेदवारांना ही याचा काही अंशत फायदा होण्याची शक्यता आहे. त्यात नितीन गवांदे, उषा जुंद्रे, राज के पुरोहित यांना ही फायदा होऊ शकतो.
"प्रभाग पुर्नरचनेमध्ये झालेल्या फेरबदलामुळे बी विभागातील 6 बुथ ए विभागात गेले आहेत. पण त्यामुळे खास असा आमच्या पक्षावर परीणाम नाही होणार. पण ज्या ज्या नगरसेवकाने त्या त्या वार्डमध्ये काम केले असेल तर त्या पक्षाला नक्कीच त्या कामाचा फायदा होेईल", असे नगरसेवक जावेद जुनेजा यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा