Advertisement

मतदारांचा एल्गार, मतदानावर बहिष्कार


मतदारांचा एल्गार, मतदानावर बहिष्कार
SHARES

पार्कसाइट - मतदान करणे ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. मात्र पार्क साईट परिसरात राहणाऱ्या तब्बल सहा हजार रहिवाशांनी चक्क मतदानावरच बहिष्कार टाकलाय. तब्बल 23 वर्षांपासून पार्कसाईट येथील हनुमान नगरातील रहिवासी एस आर ए, प्रशासन, स्थानिक राजकारणी आणि बिल्डरांविरोधात लढा देतायेत. मात्र एवढा काळ लोटून गेला तरी देखील त्यांचे प्रश्न प्रलंबितच असल्याने त्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे. हनुमान नगरमधील 15 पैकी 13 सोसायट्यांनी बहिष्काराचा हा निर्णय घेतला आहे.

1994 साली हनुमान नगरमध्ये एसआरडीची स्कीम लागू झाली आणि तेव्हापासून सुरु झालेली रहिवाशांची पिळवणूक आजतागायत सुरूच आहे. या स्कीममधील त्रुटींकडे, विकासकाने सुरु केलेल्या कारभाराविरोधात नागरिकांनी प्रशासनापासून ते सर्वच राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवले. पण कोणीच त्यांची मदत न केल्याचं इथल्या लोकांचं म्हणणं आहे.

'हे राज्य लोककल्याणकारी राज्य नसून, बिल्डरांचं राज्य आहे' अशी टीका पार्कसाईट स्वयंविकास आंदोलन समितीचे कार्यकर्ते संदीप येवले यांनी 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना केली. सिस्टीमविरोधात हा लढा सुरु असतानाच इथल्या काही लोकांना घर खाली करण्याची नोटीस उप जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवली. "ही नोटीस मागे घेण्यात यावी, बिल्डरला इथून हाकलवून आम्हाला स्वतःला विकास कारण्याची अनुमती देण्यात यावी आणि आजपर्यंत ज्या लोकांनी आमची फसवणूक केली त्यांच्याविरोधात चौकशी करण्याची मागणी इथल्या लोकांनी केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा