मनसेच्या विजयी उमेदवारावर हल्ला करणाऱ्या 7 जणांना अटक

 Mumbai
मनसेच्या विजयी उमेदवारावर हल्ला करणाऱ्या 7 जणांना अटक

मुंबई - मुंबई महानगर पालिका निवडणुकीत मिळालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या नादात मनसे विजयी उमेदवारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी ७ भाजपा कार्यकर्त्यांना अटक केली असून, त्यात भाजपाच्या अधिकृत उमेदवार सुधीर खातुल (४०) यांचा देखील समावेश आहे. सुधीर खातुल यांच्या सह पोलिसांनी किरण पवार (३१), हेमंत पवार (३२) सुनील माढगुंडे(२८), गजानन कोरवे (३५) गणेश केसरवाडी (१९) आणि वैभव गुरुलकर (१९) यांचा समावेश आहे. गुरुवारी मुंबईमहानगर पालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला ज्यात कुर्ला परिसरातून वॊर्ड क्रमांक १६६ मधून मनसेचे संजय तुरडे यांनी बाजी मारली. मात्र मनसेच्या उमेदवाराची ही जीत भाजपाला काही रास आली नाही. अवघ्या काही तासांतच त्यांनी संजय तुरडे यांच्यावर लाठ्या, काठ्या, तलवार, लोखंडी सळई आणि पेव्हर ब्लॉक घेऊन हल्ला चढवला ज्यात संजय तुरडे गंभीर जखमी झाले आहे. शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या सातही भाजपाच्या कार्यकर्त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने या सगळ्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading Comments