उंची लहान पण किर्ती महान

    मुंबई  -  

    विक्रोळी- निवडणुकांच्या रणधुमाळीत तुम्ही आजवर अनेक उमेदवार पाहिले आहेत. पण, आज आपण असा उमेदवार पाहणार आहोत, की ज्याच्यांवर सारांच्याच नजरा खिळतात. मनसेने विक्रोळीच्या 118 वॉर्डमध्ये अशा उमेदवाराला तिकीट दिलंय, ज्यांची ओळख फक्त कामामुळेच नाही तर त्यांच्या उंचीमुळेही आहे. जयंत दांडेकर यांचा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे मनसेकडून त्यांना तिकीट देण्यात आलंय. जयंत दांडेकर यांची उंची जरी कमी असली तरी ते कधीही न थकता मदतीसाठी धावून जातात असं इथल्या स्थानिकांचं म्हणणंय. उंचीने 3 फूट असलो तरी फक्त उंचीमुळे नाही तर कामामुळे ओळख रहावी असं दांडेकरांचं म्हणणंय.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.