Advertisement

लोकप्रतिनिधींना सक्तीचा 'मॉर्निंग वॉक'!


लोकप्रतिनिधींना सक्तीचा 'मॉर्निंग वॉक'!
SHARES

मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूरात सुरु झालंय. लोकप्रतिनिधींच्या स्वागतासाठी ‘संत्रानगरी’ सज्ज झालीये. पण यंदाच्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपराजधानीत दाखल झालेल्या सर्व लोकप्रतिनिधींना अधिवेशन संपेपर्यंत मॉर्निंग वॉक घेता येणार आहे, किंबहुना घ्यावाच लागणार आहे...
आमदार-मंत्र्यांच्या या वॉकसाठी विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विधिमंडळ इमारतीपर्यंत लाल गालिचे अंथरण्यात आलेत. यंदा या गालिच्यांचं वेगळं औचित्य आहे. गतवर्षीच्या अधिवेशनापर्यंत लोकप्रतिनिधींना नेण्या-आणण्यासाठी विधिमंडळाच्या इमारतीपर्यंत वाहन येत असे. यावर्षी मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सर्व वाहनांना वाहनतळापाशीच ब्रेक लावावा लागणार आहे. परिणामी, मुख्य प्रवेशद्वारापासून विधिमंडळ इमारतीपर्यंत लोकप्रतिनिधींना पायी यावं लागणार आहे. विधानभवन परिसरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य गुप्तचर विभागाने खबरदारीचा इशारा दिलाय. बनावट प्रवेशपत्र किंवा कारपास बनवून नागपूर विधानभवनात दहशतवादी प्रवेश करू शकतील, हे लक्षात घेता सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात आलंय.
निवडणूक प्रचार, विकासकामांचं उद्घाटन आदी काही प्रसंगांचा अपवाद वगळता लोकप्रतिनिधींचे पाय क्वचितच जमिनीला लागतात. विधिमंडळ सुरक्षेच्या निमित्ताने काही लोकप्रतिनिधींचे ‘पाँव जमिन पर’ लागले, हे मात्र खरं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा