Advertisement

‘आप’ ही स्वबळावर, ५० ते ५५ जागा लढवणार?

येत्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (AAP) ५० ते ५५ उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आपच्या नेत्या प्रिती मेनन शर्मा यांनी दिली.

‘आप’ ही स्वबळावर, ५० ते ५५ जागा लढवणार?
SHARES

येत्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (AAP) ५० ते ५५ उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आपच्या नेत्या प्रिती मेनन शर्मा यांनी दिली. 

‘अशी’ होईल निवड

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ‘आप’चे राज्य सचिव धनंजय शिंदे म्हणाले की, आपने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्यानुसार आतापर्यंत २५० अर्ज मेलद्वारे आले आहेत. या अर्जांच्या छाननीनंतर इच्छुकांना कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यास सांगण्यात येईल. त्यात इच्छुकांना आपल्या पाठिमागील समर्थकांची ताकद दाखवावी लागेल. आपची राज्य प्रचार समिती या मेळाव्याला हजर राहून इच्छुक उमेदवारांची निवड करेल आणि ती नावे राज्य निवड समितीसमोर ठेवण्यात येतील. त्यातील योग्य उमेदवारांची केंद्रीय निवड समितीला शिफारस करण्यात येईल. त्यानंतर अंतिम नावं जाहीर होतील. 

हेही वाचा- ‘वंचित’ला ‘आप’चा साथ?, अधिकृत घोषणेची लवकरच शक्यता

वंचितसोबत चर्चा

आपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक संस्था, संघटनांसोबत आघाडी करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि पदाधिकाऱ्यांसोबत आपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. ही बैठक सकारात्मक झाल्याचं म्हटलं जात आहे. परंतु त्यातून ठरलं हे मात्र अजून समजू शकलेलं नाही. 

आदित्य नवे पप्पू

यावेळी प्रिती मेनन यांनी आरेच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरे यांनी आरेबाबत मांडलेली भूमिका आणि कृती यामध्ये फरक असल्यााचं म्हणत त्यांना पप्पू असंही संबोधलं आहे. मेनन यांच्या टीकेला शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर देण्यात येईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



हेही वाचा-

AAP लढवणार विधानसभा निवडणूक!

Video: ‘आरे’ला हात लावू नका, आदित्य ठाकरेंनी सरकारला दिला इशारा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा