वारिस पठाण म्हणाले 'जय हिंद'


  • वारिस पठाण म्हणाले 'जय हिंद'
SHARE

दादर - वारिस पठाण...एआयएमआयएम पार्टीचे मुंबईचे प्रतिनिधीत्व करणारे एकमेव आमदार. आजही वारिस पठाण यांची 'भारतमाता की जय हे बोलताना जीभ कचरते. "देशाच्या घटनेत कुठेही भारतमाता की जय म्हणण्याची सक्ती केलेली नाही", हा त्यांचा युक्तिवाद. पण आमदार महोदयांनी मुंबई लाइव्हच्या कार्यालयात 'जय हिंद'चा नारा बुलंद केला. पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या एआयएमआयएमच्या आमदार कम प्रवक्त्यांचा रुबाब मात्र पाहण्यासारखा आहे. मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या समाजवादी पार्टीला निवडणुकीनंतर झिरो आणि आपल्या पक्षाला हिरो बनवण्याचं भाकितही वर्तवायला ते विसरले नाहीत. वारिस पठाण यांनी टीम मुंबई लाइव्हशी मनमोकळ्या गप्पा मारल्याच. सोबत फेसबुक लाइव्हमध्ये सहभागी होत हजारो नेटीझन्सच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या