अबु आझमी प्रचाराच्या रिंगणात

 Mumbai
अबु आझमी प्रचाराच्या रिंगणात
Mumbai  -  

अंधेरी - प्रभाग क्रमांक 62 चे समाजवादी पार्टीचे उमेदवार फैआज मेमन यांच्या प्रचारासाठी गुरुवारी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबु आझमी यांनी स्वत: हजेरी लावली. बेहरामबाग, गुलशननगर, एस .व्ही रोड आणि वैशालीनगर परिसरात सायकल रॅली काढून मतदारांना आकर्षित करण्यासाठी शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे.

प्रभाग क्रमांक 62 मध्ये फैयाज मेमन, चंगेज मुलतानी आणि फीरोज शाह तिघेही काँग्रेसकडून उमेदवारीचे दावेदार होते. त्यानंतर फैयाज मेमन , चंगेज मुलतानी या दोघांचा पत्ता कट करून फीरोज शाह यांना तिकीट दिलं. म्हणून फैयाज मेमन यांनी सपाची सायकल घेत रिंगणात उतरले. तर, चंगेज मुलतानी हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले. प्रभाग क्र.62 मध्ये 55820 पैकी 3200 मुस्लिम मतदार संख्या असल्याने शिवसेनेला लाभ होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading Comments