लाभार्थींना बँक खात्यामध्ये पैसे मिळणार

 Churchgate
लाभार्थींना बँक खात्यामध्ये पैसे मिळणार

मुंबई - विविध योजनांद्वारे वस्तूस्वरूपातील लाभाऐवजी रोख रकमेच्या स्वरूपातील लाभ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या धोरणास मंजुरी देण्यात आलीय. राज्यात होणारा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि लोकांपर्यंत योजना पोहोचावी यासाठी राज्यसरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. वस्तू खरेदी करण्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतो आणि वेळेवर गरजू लाभार्थींपर्यत योजना पोहोचत नाही. त्यामुळे हा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना फायदा होणार आणि त्या पैशानं लाभार्थी वस्तू विकत घेतली जाते यासाठी यंत्रणाही कार्यरत केली जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सध्या फक्त 44 योजनांमध्ये लाभार्थींना पैसे बँक खात्यात दिले जातील, अशी माहितीही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Loading Comments