Advertisement

छगन भुजबळ राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज आहेत. जाणून घ्या यामागचे नैमके कारण...

छगन भुजबळ राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची शक्यता
SHARES

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पक्ष सोडण्याची चर्चा सध्या रंगली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आणखी एका राजकीय पक्षांतराच्या मार्गावर जाणार असे बोलले जात आहे. 

हिंदुस्तान टाईम्समधील वृत्तानुसार, 76 वर्षीय नेता स्वतःचा पक्ष स्थापन करण्यासह अनेक पर्यायांवर विचार करत आहेत, तरीही शिवसेना (उबाठा) मध्ये सामील होणे हा सर्वात संभाव्य मार्ग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भुजबळांनी तीन दशकांपूर्वी अविभक्त शिवसेना सोडली होती. 

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पराभव होऊनही अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेच्या जागेसाठी निवडण्यात आल्यामुळे आपल्याला डावलल्याच्या भावनेतून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याची चर्चा आहे. 

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) नुकताच पराभव झाला. तरीही  त्यांना राज्यसभेच्या जागेसाठी निवडण्यात आले. याच कारणास्तव भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील समता परिषद या सामाजिक संघटनेच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा असंतोष दिसूनही आला. या मेळाव्यात 50 पैकी बहुतांश पदाधिकाऱ्यांनी भुजबळांना पक्षाकडून डावलल्याची वागणूक दिली जात असल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. त्यांना पुढील वाटचालीबाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले गेले. 

भुजबळांच्या जवळच्या एका NCP (AP) नेत्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, ते विविध पर्यायांचा विचार करत आहेत, पर्यायांवर चर्चा करण्यासाठी लवकरच समता पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत आणखी एक बैठक आयोजित केली आहे. अंतिम निर्णय झाला नसला तरी भुजबळ राष्ट्रवादी-अजित पवार (Ajit Pawar) गटातून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित असल्याचे बोललं जात आहे.

सुत्रांच्या माहितूनुसार, ओबीसी कोट्याबद्दल भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना पक्षातून डावलले जात असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांदरम्यान, भुजबळांनी महाराष्ट्र विकास आघाडीचे (एमव्हीए) उमेदवार राजाभाऊ वाजे यांना मवाळपणे पाठिंबा दिला.

तसेच शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची खुलेपणाने प्रशंसा केली आणि त्यांच्याबद्दल मतदारांची सहानुभूती दर्शविली. त्यामुळे येत्या काळात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  हेही वाचा

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीसाठी भूपेंद्र यादव भाजपचे प्रदेश प्रभारी

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा जागेच्या मतमोजणीत गडबड : आदित्य ठाकरे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा