SHARE

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढे येऊन विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या प्रयत्नांना वेग दिला. मुंबईत नुकतीच पार पडलेली संविधान बचाव रॅली हा त्याचाच एक भाग. या रॅलीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह डाव्या पक्षांचाही समावेश होता. पण त्यात भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर मात्र सहभागी झाले नाही. आंबेडकर या संविधान बचाव रॅलीत का सहभागी झाले नाहीत याचा खुलासा रविवारी भारिप बहुजन महासंघाच्या मेळाव्यात केला. शरद पवार हे जातीवादी असून अशा जातीवाद्यांबरोबर जाणार नसल्यानेच संविधान रॅलीत सहभागी नसल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.


एकबोटेंना पाठिशी घालण्याचा प्रयत्न

मुह मे राम, बगल मै छुरी असं पवाराचं वागणं असून हेच पवार मिलिंद एकबोटेंना पाठिशी घालत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला. भीमा-कोरेगाव प्रकरणी केव्हाही अटक होण्याची शक्यता असलेल्या एकबोटेंना सासवड येथील हिंदू- मुस्लीम दंगलीसंदर्भात मोक्का लावण्याची शिफारस पुणे पोलिसांनी केली असतानाही पवारांनी त्याला बगल दिल्याचाही आरोप आंबेडकरांनी केला.

मी तोंड उघडलं तर पवारांना पळता भुई थोडी होईल, असं आवाहन देतानाच पवार आता म्हातारे झाले आहेत, त्यामुळे त्यांनी म्हातारपणात आराम करावा असा उपरोधिक टोलाही आंबेडकरांनी लगावला.हेही वाचा-

'संविधान बचाव रॅली' कसली? ही तर 'पक्ष बचाव' रॅली- मुख्यमंत्री


संबंधित विषय
ताज्या बातम्या