'आदित्य शिवसेनेचे नवीन सेल्समन'

  Fort
  'आदित्य शिवसेनेचे नवीन सेल्समन'
  मुंबई  -  

  सीएसटी - काँग्रेसचे प्रभारी नेते डॉ. राजू वाघमारे यांनी शिवसेना आणि भाजपवर पुन्हा एकदा टीका केलीय. मराठी माणसाच्या अधोगतीला शिवसेना भाजप जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केलाय. मुंबईत 8 वी पर्यंत मोफत शाळा फक्त 10 टक्के आहेत, त्यामुळे शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांना शिक्षणाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं वाघमारे यांनी म्हटलंय. टॅब प्रकरणात मोठा घोटाळा झाला. त्यात फक्त 8 वीचे शिक्षण देण्यात आलं. नववी आणि दहावीचं शिक्षण का देण्यात आलं नाही, असं सवालही त्यांनी उपस्थित केला. आदित्य हे शिवसेनेचे नवीन सेल्समन असल्याची टीका त्यांनी केली.

  शिवसेनेनं सुरु केलेली व्हर्चुअल क्लासरूम बंद करण्याची वेळ आलीय. गेल्या 5 वर्षात महापालिका शाळांचा दर्जा खालावत आहे, त्याला कारण खिचडीचा निष्कृष्ट दर्जा, आधुनिक शिक्षण पद्धतीचा अभाव, शिक्षकांची कमतरता आहे.

  राज्य सरकार आणि महापालिकेचं एकमेकांशी ताळमेळ नाही. आदित्यनं गेल्या सरकार आणि भाजपला नालायक म्हटलं, तो शब्द भाजप- शिवसेनेला योग्य वाटतो, अशी टीका वाघमारे यांनी केली. गेले दोन वर्षे सत्तेत असतानाही केजीचा कायदा केला नाही. अनेक सोयी सुविधांच्या अभावामुळं पालिका शिक्षनाचा दर्जा खालावलाय, याबाबत थर्ड पार्टीकडून तपासणी करण्याची मागणी काँग्रेसने केलीय. मुंबई काँग्रेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.