रोड शो करत 'युवराजां'चा प्रचार

Mumbai  -  

वाळकेश्वर - भाजपाचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा वाळकेश्वर परिसर. पण आता युती तुटल्यानतंर शिवसेनेनंही कबंर कसली आहे. या प्रभागात भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेकडून दुर्गा शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द युवासेनेचे अध्यक्ष अादीत्य ठाकरेंनी रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधला.

या भागात आतापर्यंत भाजपाचा नगरसेवक होता. मात्र भाजपाने या परिसरासाठी काहीच केले नाही, असा आरोप शिवसैनिकांकडून केला जातोय. पण वाळकेश्वर परिसरातील जनता दुर्गा शिंदे यांच्यावर विश्वास दाखवतील का? ते 21 तारखेला होणाऱ्या निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

Loading Comments