Advertisement

आदित्य यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी?

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण किंवा क्रीडा खात्यात काम करण्याची उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे त्यांना हे खातं मिळणार की नाही यावरही सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

आदित्य यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी?
SHARES

महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठल्या पक्षाच्या वाट्याला कुठलं खातं येणार यावरून जोरदार रस्सीखेच सुरू असताना शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण किंवा क्रीडा खात्यात काम करण्याची उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे त्यांना हे खातं मिळणार की नाही यावरही सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची गुरूवारी बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीकडून अजित पवार, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात तसंच अशोक चव्हाण सहभागी झाले होते. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये ४ तास चर्चा झाली. ग्रामीण खात्याशी संबंधित एक तरी खातं मिळावं, यावर काँग्रेस अडून बसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

हेही वाचा- खातेवाटपावरून चव्हाण, पवार यांच्यात खडाजंगी?

शिवसेनेने आपल्याकडील कृषी खातं काँग्रेससाठी सोडावं, अशी काँग्रेसच्या नेत्यांची मागणी असल्याचं कळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या मागण्यांचा एक प्रस्ताव तयार करून तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. या प्रस्तावावर तेच अंतिम निर्णय घेतील, असं पवार यांनी सांगितलं.   

त्यातच ठाकरे सरकारमध्ये आदित्य कुठल्या खात्याची जबाबदारी पार पाडणार याविषयीची उत्सुकता ताणली आहे. पर्यावरण आणि क्रीडा यापैकी एखादं खातं आदित्य ठाकरेंकडे जाण्याची शक्‍यता आहे. विशेषत: प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तसंच  मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये झालेली वृक्षतोड रोखण्यासाठी  आदित्य यांनीच पुढाकार घेतला होता.

परंतु त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव नसताना ते कॅबिनेट पद कसे सांभाळणार यावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.  

हेही वाचा- खडसेंचे आरोप निराधार- गिरीश महाजन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा