आदित्य ठाकरेंच्या गाडीला अपघात


  • आदित्य ठाकरेंच्या गाडीला अपघात
  • आदित्य ठाकरेंच्या गाडीला अपघात
SHARE

वांद्रे - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीला अपघात झाला होता. मुंबईतील वांद्रे भागातल्या खेरवाडी जंक्शनजवळ हा अपघात झाला असून सुदैवाने यात कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. आदित्य ठाकरे निळ्या रंगाची बीएमडब्ल्यू चालवत होते. या वेळी दुसऱ्या गाडीला त्यांच्या गाडीची जोरदार धडक बसली. मात्र आदित्य यांची चूक नसून ते वाहतुकीच्या नियमांचं पालन करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातग्रस्त गाडीच्या चालकाने आणि कारमधील इतरांनीही अपघात त्यांच्याच चुकीमुळे झाल्याची कबुली दिली आहे. अपघातानंतर आदित्य दुसऱ्या गाडीतून निघून गेले. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या