Advertisement

मंगळवारपासून मुंबई महापालिकेवर 'प्रशासक राज'

मंगळवारपासून मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासक पाहणार आहेत.

मंगळवारपासून मुंबई महापालिकेवर 'प्रशासक राज'
SHARES

मंगळवारपासून मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासक (administrator) पाहणार आहेत. जोपर्यंत महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत प्रशासकच मुंबई महापालिकेचा गाडा हाकणार आहे.

मुंबई महापालिकेवर प्रशासक नियुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर महापौर किशोरी पेडणेकर या काळजीवाहू महापौर असणार आहेत. महापौर किशोरी पेडणेकर (mayor kishori pednekar) यांनी पत्रकार परिषद घेऊन आमचा कार्यकाळ संपला असल्यानं उद्यापासून माझी नवी इनिंग सुरू होत असल्याचं म्हटलं आहे.

“मी काळजीवाहू महापौर म्हणून काम करणार आहे. मी मुंबईला असेच सोडणार नाही. मी काम करणार,” असा निर्धारही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

उद्यापासून माझी नवी इनिंग सुरू होत आहे. आता पुन्हा जोमाने काम करू. पक्ष बांधणीसाठी वेळ देणार आहे. मी परिचारिका होते. परिचारिकेची आवड असल्यानेच मी काम करू शकले. मग कोरोना काळात स्थिती हाताळण्याची संधी मिळाली. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला मोठी संधी दिली. त्यामुळे मी काम करू शकले. त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

कोरोना काळात मुंबईनं चांगलं काम केलं. कोरोना रोखण्यात मुंबई यशस्वी ठरली. देशात अव्वल ठरली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आव्हानांना संधी मानून काम केलं, असं सांगतानाच मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. शिवसेनेचाच महापौर बसेल, असंही त्या म्हणाल्या.

दिशा सालियन प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आपल्याला फोन केला होता, असा आरोप केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला होता. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री फोन करणार नाहीत. राणे खोटं बोलत आहेत. फोन केला असेल तर पुरावा दाखवा, असं आव्हानच त्यांनी राणेंना दिलं.

तसंच पोलिसांना बाजूला करा म्हणता, मग तुम्हीही ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणा बाजूला करा, मग बघा काय होतं ते. उगाच राजकारणाचा स्तर घसरत आहे, असंही त्या म्हणाल्या.



हेही वाचा

मंत्री नवाब मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबईत आमचा भगवाच राहणार - किशोरी पेडणेकर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा