Advertisement

मंत्री नवाब मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मंत्री नवाब मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
SHARES

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष पीएमएलए कोर्टानं नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दाऊद इब्राहिमशी संबधित मनी लॉन्डिरग प्रकरणात नवाब मलिक यांना दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली होती.

ईडीने मंत्री नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी मनी लॉड्रिंग प्रकरणात अटक केली होती. यानंतर न्यायालयानं नवाब मलिक यांना ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. त्यानंतर सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

दाऊद इब्राहिमशी संबधित मनी लॉन्डिरग प्रकरणात नवाब मलिक यांना दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयानं मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले होते. ही कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयानं मलिक यांना ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती.

सकाळी ६ वाजता केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मलिक यांच्या घरी पोहोचले, जिथे त्यांची तासभर चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले आणि त्यांची प्रदीर्घ चौकशी झाली. चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा