Advertisement

शिवाजी पार्कात नमाज पठणासाठी परवानगी द्या, औरंगाबादच्या वकिलाची मागणी

राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ समोर म्हणजेच शिवाजीपार्क मैदानात एका वकिलानं नमाज पठण करण्याची परवानगी मागितली आहे.

शिवाजी पार्कात नमाज पठणासाठी परवानगी द्या, औरंगाबादच्या वकिलाची मागणी
SHARES

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. असं असताना राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ समोर म्हणजेच शिवाजीपार्क (Shivaji Park) मैदानात एका वकिलानं नमाज पठण करण्याची परवानगी मागितली आहे.

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात (Shivaji Park) रमजान ईद (Ramzan Eid) निमित्तानं नमाज पठण करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी औरंगाबादच्या एका वकिलांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

रमजान ईदच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदान नमाज पठण करण्यासाठी राखीव मिळावं, अशी मागणी वकिलांनी नगरविकास मंत्र्यांकडे केली. नईम शहाबुद्दीन शेख यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे. वकील शेख यांनी मुंबई महापालिकेलाही (BMC) याबाबतचं विनंती करणारं पत्र पाठवलं आहे. पण त्यांच्या या पत्रावर मुंबई महापालिकेने स्पष्ट नकार दिला आहे.

शिवाजी पार्क मैदान हे बाल दिन, महाराष्ट्र दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, दसरा मेळावा, गुढीपाडवा, मराठी भाषा दिन, जगन्नाथ यात्रा आणि गणेश विसर्जन, वाहनस्थळ अशा समरंभाला ५ दिवस राखीव असते. त्या ५ दिवसांपैकी मुस्लिम समाजाच्या समस्या दूर करण्यासाठी एक दिवस रमजान ईदचं नमाज पठन करण्यासाठी राखीव ठेवण्यात यावं.

सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत ईद निमित्त नमाज पठण करण्यास परवानगी मिळावी, असे पत्रात लिहिले आहे. वकिलांनी हे पत्र मुंबई महापालिकेला पाठवलं.

वकील नईम यांच्या पत्राला मुंबई महापालिकेने उत्तर दिलं आहे. पालिकेने नमाज पठणासाठी मैदान राखीव ठेवण्यासाठी परवानगी देता येणार नाही, असं स्पष्ट सांगितलं आहे.

"मुंबई उच्च न्यायालयाने ४ जानेवारी २००३ रोजी दिलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र शासनास मैदानामध्ये ४५ दिवसांच्या कार्यक्रमांची परवानगी देण्याचे वाटप केलेले आहे. त्यामुळे आपणांस परवानगी देता येणार नाही", असं उत्तर मुंबई महापालिकेकडून देण्यात आलं आहे.



हेही वाचा

केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक, मुख्यमंत्र्यांची नाराजी

मुंबई पोलीस विरुद्ध CISF, संजय पांडेचे CISFच्या महासंचालकांना पत्र

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा