Advertisement

मतदारांनी मोदींच्या धमक्यांना थारा दिला नाही- शरद पवार

आजच्या पिढीने जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना पाहिलेलं नाही. त्यांनी केवळ मागील १० वर्षातलं मनमोहन सिंग यांचं सरकार, त्यांचं राजकारण बघितलं आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे केवळ संसदेचे सदस्य असताना तसंच ते सत्तेत नसताना मोदी त्यांच्यावर व्यक्तीगत हल्ला का करत आहेत, याचं आश्चर्य या पिढीला नक्कीच वाटलं असणार. म्हणूनच या मतदारांनी भाजपच्या व्यक्तीगत हल्ल्यांना थारा दिला नाही.

मतदारांनी मोदींच्या धमक्यांना थारा दिला नाही- शरद पवार
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी जनतेला जी आश्वासने दिली होती, त्या आश्वासनांवर बोलण्याऐवजी मोदींनी केवळ एकाच कुटुंबाला लक्ष्य केलं. गांधी कुटुंबावर व्यक्तीगत हल्ला करतानाच त्यांना दिलेल्या धमक्या मतदारांना रूचल्या नाहीत. त्याचेच पडसाद उमटून पाचही राज्यांत भाजपाला सपाटून मार खावा लागला, असं म्हणत सध्या देशात काळजी करण्यासारखं वातावरण असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी ही चिंता व्यक्त केली.


मर्यादा सोडल्या

विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान पदावरील व्यक्तीने काही मर्यादा ठेवायच्या असतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचा विसर पडला. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी दिलेली आश्वासने, त्यांची पूर्तता यावर बोलण्याऐवजी त्यांनी नेहरू-गांधी कुटुंबावर एकेरी शब्दांत टीका केली. या निवडणुकीत भाजपाने पैशाचा भरमसाठ वापर केला. अत्यंत आक्रमकपणे प्रचार करताना ‘आता आम्ही काय करतो हे तुम्हाला दाखवूच’ अशा धमक्याही दिल्या.


व्यक्तीगत हल्ला

मात्र, आजच्या पिढीने जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना पाहिलेलं नाही. त्यांनी केवळ मागील १० वर्षातलं मनमोहन सिंग यांचं सरकार, त्यांचं राजकारण बघितलं आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे केवळ संसदेचे सदस्य असताना तसंच ते सत्तेत नसताना मोदी त्यांच्यावर व्यक्तीगत हल्ला का करत आहेत, याचं आश्चर्य या पिढीला नक्कीच वाटलं असणार. म्हणूनच या मतदारांनी भाजपच्या व्यक्तीगत हल्ल्यांना थारा दिला नाही.


घटनात्मक संस्थावर हल्ला

आर्थिक सल्लागारांचा सल्ला न घेता केलेली नोटाबंदी, रिझर्व्ह बँक, सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालय अशा घटनात्मक संस्थावर केलेला हल्ला देखील जनतेला पटला नाही. भाजपाच्या भूमिकेमुळे सध्या देशात काळजी करण्यासारखं वातावरण निर्माण झालं आहे. या पाच राज्यांच्या निकालावरून तरी देशाने काँग्रेसला स्वीकारल्याचं चित्र दिसत आहे. बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांनी येत्या काळात काँग्रेसला साथ द्यावी अशी, इच्छाही शरद पवार यांनी व्यक्त केली.



हेही वाचा-

मोदी, शहांच्या मुजोरीला उत्तर- राज ठाकरे

मतदारांनी जे नको ते नाकारलं- उद्धव ठाकरे



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा