Advertisement

मतदारांनी जे नको ते नाकारलं- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनीही भाजपाला कोंडीत पकडलं आहे. या निकालानं ४ राज्यांत परिवर्तन घडवलं घडवलं असून परिवर्तन घडवणाऱ्या, धाडस दाखवणाऱ्या मतदारांचं मी अभिनंदन करतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपालाच टोला लगावला आहे.

मतदारांनी जे नको ते नाकारलं- उद्धव ठाकरे
SHARES

निवडणुकीत हार जीत होतच असते. जे जिंकले त्यांचं अभिनंदन, असं म्हणत केंद्रात आणि राज्यात भाजपाबरोबर सत्तेत असलेल्या शिवसेनेनं भाजपाच्या जखमेवरच्या खपल्या काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पर्याय कोण या फालतू प्रश्नात न पडता मतदारांनी जे न को ते नाकारलं. मतदारांच्या या धाडसाबद्दल मतदारांचा अभिनंदन, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकेचा बाण सोडला आहे.


राऊतांची टीका

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यातील भाजपाच्या हाती असलेली सत्ता खेचून घेण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे. भाजपाच्या या पराभवानंतर नाराज मित्रपक्षानं, शिवसेनेनं भाजपाला घेरण्याची ही संधीही सोडलेली नाही. आधी खासदार संजय राऊत यांनी मित्रपक्षांना कमी लेखल्याचा हा परिणाम असल्याचं म्हणत भाजपाला लक्ष्य केलं.


काय म्हणाले उद्धव?

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही भाजपाला कोंडीत पकडलं आहे. या निकालानं ४ राज्यांत परिवर्तन घडवलं घडवलं असून परिवर्तन घडवणाऱ्या, धाडस दाखवणाऱ्या मतदारांचं मी अभिनंदन करतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपालाच टोला लगावला आहे.


मतदारांचं धाडस

ईव्हीएम मशिन, पैसा वाटप, गुंडागर्दी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पर्याय कोण या फालतू प्रश्नात गुंतून न पडता मतदारांनी नको असलेल्या नाकारल्याचं म्हटलं आहे. या निकालींनी एका परिवर्तनाला सुरूवात झाली असून मतदारांच्या धाडसाने देशाला दिशा दाखवली आहे, असं स्पष्ट केलं आहे.हेही वाचा- 

मोदी जानेवाले है, राहुल आनेवाले है- अशोक चव्हाण

मित्रपक्षांना कमी लेखल्याचा हा परिणाम; संजय राऊतांचा भाजपाला टोलाRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा