Advertisement

मित्रपक्षांना कमी लेखल्याचा हा परिणाम; संजय राऊतांचा भाजपाला टोला

भाजपाची सत्ता असलेल्या तीन प्रमुख राज्यांमध्ये जनतेनं भाजपाला नाकारत काँग्रेसच्या बाजूनं कल दिला आहे. या निकालानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया राऊत यांच्या रुपानं आली आहे. तीन राज्यांत काँग्रेसनं सरशी मारली असून भाजपाचा पराभव हा जनतेचा राग आहे.

मित्रपक्षांना कमी लेखल्याचा हा परिणाम;  संजय राऊतांचा भाजपाला टोला
SHARES

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांचे कल हाती घेत असून भाजपाचं दोन राज्यात पानीपत झालं अाहे. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस-भाजपामध्ये कांटे की टक्कर सुरू आहे. हे कल लक्षात घेत जनतेनं भाजपाला नाकारायला सुरूवात केली आहे, जनतेनं भाजपाला धडा शिकवला आहे असं म्हणत शिवसेनेनं आता भाजपाला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. मित्रपक्षांना कमी लेखल्याचा हा परिणाम असून आता भाजपाला आत्मचिंतनाची गरज असल्याचा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.आत्मपरिक्षण करावं

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे कल समोर येत आहेत. त्यानुसार भाजपाची सत्ता असलेल्या तीन प्रमुख राज्यांमध्ये जनतेनं भाजपाला नाकारत काँग्रेसच्या बाजूनं कल दिला आहे. या निकालानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया राऊत यांच्या रुपानं आली आहे. तीन राज्यांत काँग्रेसनं सरशी मारली असून भाजपाचा पराभव हा जनतेचा राग आहे. मित्रपक्षांना कमी लेखण्याचा परिणाम आहे. तेव्हा भाजपानं आता तरी जनतेचा राग समजावून घेत आत्मपरिक्षण करावं, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.


काँग्रेसचा जल्लोष 

छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसनं सरशी मारली असून मध्यप्रदेशातही काँग्रेस बऱ्यापैकी आघाडीवर आहे. या निकालानंतर दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घराबाहेर जल्लोष सुरू आहे. तर हाच जल्लोष मुंबईतही पहायला मिळत आहे. दादर येथील काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयाबाहेर दुपारी बारा वाजल्यापासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी जमण्यास सुरूवात झाली असून फटाके फोडत, ढोल वाजवत जल्लोष साजरा केला जात आहे. हा जल्लोष आता थोड्याच वेळात काँग्रेसकडून मुंबईच्या इतर भागातही साजरा केला जाण्याची शक्यता आहे.हेही वाचा - 

निकालांचा इफेक्ट: शेअर बाजार ३५० अंकांनी गडगडला
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा