Advertisement

मोदी जानेवाले है, राहुल आनेवाले है- अशोक चव्हाण

हा विजय म्हणजे अहंकारावर प्रेमाचा विजय आहे, हा विजय म्हणजे हुकुमशाहीवर लोकशाहीचा विजय आहे असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला लगावत हाच ट्रेंड महाराष्ट्रातही दिसेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

मोदी जानेवाले है, राहुल आनेवाले है- अशोक चव्हाण
SHARES

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. मोदी, मशीन आणि मनी या तिन्ही गोष्टी या निवडणुकीत चालल्या नाहीत, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. तर मोदी लाट, हवा ओसरली असून २०१९ मध्ये भाजपाची घरवापसी होणार, मोदी जानेवाले है, राहुल आनेवाले, असं म्हणत २०१९ मध्ये देशात पुन्हा काँग्रेसचं सरकार येणार, असा विश्वासही व्यक्त केला आहे.


जल्लोषाचं वातावरण

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राज्यस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या ३ राज्यात काँग्रेस पुन्हा वर आली आहे. गेल्या कित्येक वर्षांनंतर काँग्रेसला असं चांगलं यश पाहायला मिळालं आहे. त्यामुळे दिल्ली ते मुंबईपर्यंत सर्वत्र काँग्रेस नेत्यांमध्ये-कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. असाच जल्लोष केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी दुपारी मुबंईत पत्रकार परिषद घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं या यशाबद्दल अभिनंदन केलं.


ईव्हीएमवर बारीक लक्ष

बेरोजगारी, महागाई आणि अन्य समस्यांनी जनता त्रस्त झाली आहे हेच या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होत आहे. ईव्हीएमशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न झाला. पण काँग्रेस कार्यकर्त्याचं बारीक लक्ष ईव्हीएम मशिनवर होतं. त्यामुळं ईव्हीएमबाबत कुठेही तक्रार झाली नाही, असं म्हणत चव्हाण यांनी या निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.


अहंकारावर प्रेमाचा विजय

त्याचवेळी हा विजय म्हणजे अहंकारावर प्रेमाचा विजय आहे, हा विजय म्हणजे हुकुमशाहीवर लोकशाहीचा विजय आहे असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला लगावत हाच ट्रेंड महाराष्ट्रातही दिसेल अशी अपेक्षा व्यक्त केली.हेही वाचा-

मित्रपक्षांना कमी लेखल्याचा हा परिणाम; संजय राऊतांचा भाजपाला टोला

निवडणूक निकालांवर सट्टेबाजांनी लावले ४० हजार कोटीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा