Advertisement

मागण्या मान्य झाल्यानं संभाजीराजेंनी आमरण उपोषण सोडलं

सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

मागण्या मान्य झाल्यानं संभाजीराजेंनी आमरण उपोषण सोडलं
SHARES

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर उपोषण अखेर सोडलं. मराठा आरक्षणाच्या मुद्दावर खासदार संभाजीराजे भोसले यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. उपोषणाचा सोमवारी तिसरा दिवस होता. सोमवारी राज्य सरकारनं संभाजीराजे यांना चर्चेसाठी निमंत्रण धाडलं होतं. त्यानुसार, प्रतिनिधी वर्षावर चर्चेला जातील असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं होतं. या चर्चेनंतर मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण सोडलं.

सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. खासदार संभाजीराजेंच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनी आंदोलनस्थळी भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण सोडलं आहे. गृहमंत्री वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. मात्र, संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमलबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले होते.

त्यानंतर, माध्यमांशी बोलताना वळसेपाटील यांन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं सांगितलं. आज, मुख्यमंत्र्यांच्यावतीने मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंशी चर्चा केली. त्यानंतर, संभाजीराजेंनी ज्युस घेऊन उपोषण सोडले.

छत्रपती संभाजीराजे आझाद मैदानातील मांडवात गादी टाकून झोपल्याचे फोटो, मोबाईल हातात घेऊन पाहतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यासह, माझा राजा उपाशी... अशा कॅप्शनने हे फोटो शेअर होत आहेत. ज्यांच्या पूर्वजांनी आरक्षण दिलं, त्या गादीचे वारसदार आज आरक्षणासाठी आझाद मैदानावर बसल्याने अनेकांनी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा