Advertisement

Exit Poll Results: तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग

तेलगू देशम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिसऱ्या आघाडीसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. निकाल एक्झिट पोलच्या विरूद्ध गेल्यास तिसऱ्या आघाडीला महत्त्व प्राप्त होणार आहे.

Exit Poll Results: तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग
SHARES

लोकसभा निवडणुकीचं मतदान संपलं असून सर्वच एक्झिट पोल्सनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा केंद्रातील सत्ता काबिज करणार, असे अंदाज वर्तवले आहेत. असं असूनही तेलगू देशम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिसऱ्या आघाडीसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. निकाल एक्झिट पोलच्या विरूद्ध गेल्यास तिसऱ्या आघाडीला महत्त्व प्राप्त होणार आहे. 

एक्झिट पोलचे निकाल मागच्या २० वर्षांमध्ये सातत्याने चुकीचे येत आहेत, एक्झिट पोलचे निकाल तसंच प्रत्यक्ष निकाल यामध्ये कमालीचा फरक असल्याने भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी हालचाली केल्या पाहिजेत, असं मत चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केलं. त्यानुसार त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. 

तर, दुसऱ्या बाजूला शरद पवारही कामाला लागले आहेत. त्यांनीही नायडू यांच्यासोबतच राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली आहे. जेडीयू नेते शरद यादव तसंच भाकपाच्या नेत्यासोबत चर्चा करण्याबरोबरच सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बसपाच्या प्रमुख मायावती यांच्याशीही तिसरी आघाडी स्थापण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. नायडू यांनी या दोघांशी चर्चा केल्यावर पुन्हा पवार आणि गांधी यांची भेट घेतली. 



हेही वाचा-

'या' ३ केंद्रांवर होणार मुंबईतील लोकसभेच्या ६ जागांची मतमोजणी

Exit Polls Results 2019: राज्यात युतीचाच झेंडा फडकणार, ४८ पैकी ३६-३८ जागा मिळण्याचा अंदाज



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा