Advertisement

'या' ३ केंद्रांवर होणार मुंबईतील लोकसभेच्या ६ जागांची मतमोजणी

महाराष्ट्रातील ४८ लोकसभेच्या जागांसाठी ३८ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सर्व इव्हीएम मशीन्स मतमोजणीच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईतील लोकसभेच्या ६ जागांच्या मतमोजणीसाठी ३ केंद्र बनविण्यात आले आहेत.

'या' ३ केंद्रांवर होणार मुंबईतील लोकसभेच्या ६ जागांची मतमोजणी
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी पार पडलं. सर्व टप्प्यांमधील मतदान झाल्यानंतर देशातील सर्व नागरिकांचं लक्ष आता मतमोजणीवर लागलं आहे. रविवारी अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यावर सर्व वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल्स दाखविण्यास सुरूवात केली असून, या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु, २३ मे रोजी मतांची मोजणी होणार आहे. त्यानंतर नागरिकांचा कौल कोणाच्या बाजूनं लागला हे समजेलं. दरम्यान, निवडणूक आयोगानं मतमोजणीच्या तयारीला सुरूवात केली आहे. त्याशिवाय सुरक्षाव्यवस्था देखील  तैनात करण्यात आली आहे.

३८ ठिकाणी मतमोजणी

महाराष्ट्रातील ४८ लोकसभेच्या जागांसाठी ३८ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सर्व इव्हीएम मशीन्स मतमोजणीच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. तसंच या इव्हीएम मशीन्स कडक सुरक्षाव्यवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कोणालाही जाण्यास मनाई आहे.

मतमोजणीसाठी ३ केंद्र

मुंबईतील लोकसभेच्या ६ जागांच्या मतमोजणीसाठी ३ केंद्र बनविण्यात आले आहेत. उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मतदारसंघाची मतमोजणी गोरगाव पूर्व येथील नेस्को ग्राऊंडमध्ये होणार आहे. दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई मतदारसंघाची मतमोजणी शिवडी पूर्व येथील न्यू शिवडी वेअरहाऊसमध्ये होणार आहे. तर, उत्तर पूर्व मतदारसंघाची मतमोजणी विक्रोळी पूर्व येथील उदयांचल प्रायमरी शाळेमध्ये होणार आहे.

अन्य मतमोजणी केंद्र

पालघर मतदारसंघाची मतमोजणी न्यू गव्हर्नमेंट सूर्या कॉलनी, भिवंडी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी महावीर फाउंडेशन रेसिडेन्सी स्कूल, कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी डोंबिवलीमधील सुरेंद्र वाजपेयी क्रीडा गृह, ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी घोडबंदर रोड, रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अलिबागमधील डिस्ट्रिक स्पोट्स ग्राउंड आणि मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी पुण्यातीस छत्रपति स्पोट्स कॉम्प्लेक्समध्ये करण्यात येणार आहे.

२३ मे रोजी मतमोजणी

गुरुवार २३ मे रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मतमोजणीसाठी नियुक्ती केलेले अधिकारी मतमोजणी ठिकाणी पोहोचतील. सकाळी ८ वाजता सुरूवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन(इव्हीएम)मधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

Exit Polls Results 2019: राज्यात युतीचाच झेंडा फडकणार, ४८ पैकी ३६-३८ जागा मिळण्याचा अंदाज

एक्झिट पोल इफेक्ट, सेन्सेक्स ११०० अंकांनी उसळला



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा