Advertisement

मनसेनंतर आता शिवसेनेचा मिसळ महोत्सव!


मनसेनंतर आता शिवसेनेचा मिसळ महोत्सव!
SHARES

राज्यातील अनेक शहरांमधील प्रसिद्ध झणझणीत मिसळची चव मुंबईतील जनतेला एकाच छताखाली घेता यावी, यासाठी मनसेने पुढाकार घेऊन मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केली. पण आता महोत्सवाच्या आयोजनात शिवसेनेनेही उडी घेतली आहे. दिडोंशीचे आमदार आणि शिवसेना विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी दिंडोशी मिसळ महोत्सवाचे आयोजन करत दिडोशींकरांना सर्वच प्रकारच्या झणझणीत मिसळचा आस्वाद लुटण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.


रविवारी महोत्सवाचा शेवटचा दिवस

मुंबईकरांना इच्छा असूनही आपल्या कुटुंबासह विविध जिल्ह्यांमधील मिसळच्या चवीचा आस्वाद घेता येत नाही. त्यामुळे मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आमदार सुनील प्रभू यांच्या संकल्पनेतून तीन दिवसीय मिसळ महोत्सवाचे आयोजन मालाड पूर्व कुरार व्हिलेज तांबे मैदान येथे करण्यात आले आहे. शुक्रवारपासून या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. अभिनेता शशांक केतकर यांच्या उपस्थितीत आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन शुक्रवार पार पडले. यावेळी प्रो कबड्डी स्टार रीशांक देवाडिगा याने देखील मिसळ महोत्सवात सहभागी होऊन झणझणीत मिसळचा आस्वाद घेतला. रविवारी २२ एप्रिलपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.


पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

यावेळी नगरसेवक सुहास वाडकर, तुळशीराम शिंदे, आत्माराम चाचे, नगरसेविका विनया सावंत, उपविभाग प्रमुख विष्णू सावंत, , माजी नगरसेवक गणपत वारिसे, सदाशिव पाटील, प्रशांत कदम, उपविभाग प्रमुख विष्णू सावंत, उपविभाग संघटक रीना सुर्वे, पूजा चव्हाण, पोलिस निरीक्षक उदय राजेशिर्के, सर्व शाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख, शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा