Advertisement

महाराष्ट्रावर वार! एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून भाजपचं 'ऑपरेशन कमळ', सामनातून टिका

महाराष्ट्रावर वार' या मथळ्याखाली हा अग्रलेख लिहिण्यात आला असून यात भाजपवर टीका करण्यात आली आहे.

महाराष्ट्रावर वार! एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून भाजपचं 'ऑपरेशन कमळ', सामनातून टिका
SHARES

बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेनं 'सामना'च्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. 'महाराष्ट्रावर वार' या मथळ्याखाली हा अग्रलेख लिहिण्यात आला असून यात भाजपवर टीका करण्यात आली आहे.

यात म्हटलं आहे की, भाजप एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून ऑपरेशन कमळ घडवत आहे. धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करेल काय? असा सवाल देखील करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सरकारचे काय होणार हा प्रश्न नसून महाराष्ट्रावर वार करणाऱ्यांचे काय होणार? फितुरीचे बीज रोवणाऱ्यांचे काय होणार? असा देखील सवाल लेखात केला गेला आहे.

लेखात म्हटलं आहे की, संकटांशी आणि वादळांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय आहे. गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा! गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच, असं लेखात म्हटलं आहे.

अग्रलेखात म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील सरकारला खाली खेचण्याची एकही संधी भाजपवाले सोडत नाहीत. अडीच वर्षांपूर्वी अजित पवारांचे प्रकरण पहाटे झाले. त्यात यश आले नाही. आता तेच अस्वस्थ आत्मे एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर बसून 'ऑपरेशन कमळ' घडवीत आहेत. काही करून राज्यातील सरकार घालवायचे याच ईर्षेने त्यांना झपाटलेले आहे. राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपने कोणत्या छुप्या कारवायांमुळे जिंकली याचा उलगडा आता होत आहे. काल विधान परिषदेत भाजपास दहावी जागा जिंकण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांनीच राज्यसभेत भाजपचा धनदांडगा उमेदवार विजयी केला आणि संजय पवार या शिवसैनिकाचा पराभव घडवून आणला.

पुढे म्हटलं आहे की, सोमवारी विधान परिषदेत दहावी जागा जिंकताच शिवसेनेच्या दहाएक आमदारांना 'उचलून' गुजरातला नेण्यात आले. त्यांच्या भोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. यातील दोन-चार आमदारांनी या गराड्यातून सुटण्याचा आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शारीरिक इजा होईपर्यंत मारहाण करण्यात आली.

अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना तर इतकी मारहाण झाली की त्यांना हृदयविकाराचा झटका आला व इस्पितळात दाखल करावे लागले. कैलास पाटील हे आमदार घेराबंदीतून सटकले आणि भर पावसात चालत रस्त्यावर येऊन कसेबसे मुंबईस पोहोचले. अशाप्रकारे चार-पाच आमदारांनी सुटकेचा प्रयत्न केला तेव्हा गुजरात पोलिसांनी त्यांना अटक करून 'ऑपरेशन कमळ'वाल्यांच्या ताब्यात दिले. हा काय प्रकार आहे? अशाने लोकशाहीची काय इभ्रत राहणार आहे? असा सवाल लेखात करण्यात आला आहे.



हेही वाचा

महाराष्ट्र सरकार संकटात? एकनाथ शिंदेंसह असलेल्या ३५ आमदारांचा फोटो व्हायरल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा