Advertisement

महाराष्ट्र सरकार संकटात? एकनाथ शिंदेंसह असलेल्या ३५ आमदारांचा फोटो व्हायरल

या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे यांच्यासह असलेल्या आमदारांचा एक फोटो व्हायरल होत आहे.

महाराष्ट्र सरकार संकटात? एकनाथ शिंदेंसह असलेल्या ३५ आमदारांचा फोटो व्हायरल
SHARES

राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबच्या सर्व बंडखोर आमदारांना गुवाहाटीला नेण्यात आल्याची माहिती आहे. आधी सुरतच्या हॉटेलमध्ये या आमदारांचा मुक्काम होता. 

या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे यांच्यासह असलेल्या आमदारांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बच्चू कडू सुद्धा दिसत आहेत. सुरतच्या हॉटेलमधील हा फोटो असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फोटोमध्ये एकनाथ शिंदेंसोबत 34-35 आमदार दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकार पडणार की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे. 


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे बोलले की, त्यांना केवळ 35 आमदारांचाच नाही, तर 40 आमदारांचा पाठिंबा आहे. 

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतांची जुळवाजुळव केली ती पाहता एकनाथ शिंदे यांच्या दाव्यानुसार जर  40 शिवसेना आमदार  असतील तर सत्तेची गणित बसवणं भाजपासाठी कठीण जाणार नाही. 

दरम्यान, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि आमदार रविंद्र पाठक हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले आहेत. या दोघांवर एकनाथ शिंदे यांचे मन वळवून पुन्हा मुंबईला आणण्याची जबाबदारी आहे. तसं जरी नाही घडलं तरी इतर समर्थक आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न हे नेते करणार असल्याची माहिती आहे. 

यासोबतच एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांना परतण्याची ताकीद संजय राऊतांनी दिली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला आहे का, असा प्रश्न संजय राऊतांना पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले की भाजपसोबत सरकारमध्ये असताना त्यांच्याकडे कोणती खाती होती आणि आज महाविकास आघाडीत त्यांच्याकडे कोणती खाती आहेत, त्यांची किती प्रतिष्ठा वाढली आहे, हे पाहावं. शिंदे आणि सहकाऱ्यांनी प्रेमाने परत यावं, त्याचं स्वागत करु." अशी गळ संजय राऊतांनी घातली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा