Advertisement

सिंचन घोटाळा - एसीबीचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर झाल्यानंतर काय म्हणाले अजित पवार?


सिंचन घोटाळा - एसीबीचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर झाल्यानंतर काय म्हणाले अजित पवार?
SHARES

राष्ट्रवादी नेते आणि माजी जलसंपदा मंत्री अजित पवार हे २००४ ते २००८ मध्ये झालेल्या सिंचन घोटाळ्याला जबाबदार असल्याचं २७ पानांचं प्रतिज्ञापत्र लाचलूतपत विभागानं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. न्यायालयात हे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. मुंबईत हिवाळी अधिवेशनाचं बुधवारचं कामाकाज सुरू होण्याआधी प्रसारमाध्यमांसमोर पवारांनी त्यांची बाजू मांडली आहे.


'याला' अजित पवारच जबाबदार

लाचलुतपत प्रतिबंधक विभागानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २७ पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात अजित पवार सिंचन घोटाळ्यासाठी जबाबदार असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तसंच, ठेका देण्याचं पुर्वनियोजित षड:यंत्र रचणे, प्रकल्पाची किंमत वाढवणे, नियमांचे उल्लंघन करणे, राज्याला प्रचंड नुकसान पोहचवणे असा ठपका अजित पवारांवर ठेवण्यात आला आहे.


अजित पवारांची प्रतिक्रिया

याबाबत हिवाळी अधिवेशनाचं बुधवारचं कामाकाज सुरू होण्यापूर्वी प्रसार माध्यमांसमोर पवारांनी त्यांची बाजू मांडली, 'मी आधीपासूनच सांगतोय की, कायदा-नियम हे सगळ्यांनाच सारखे असतात. भाजप-शिवसेनेचं सरकार आल्यावर त्यांनी ओपन इन्क्वायरी केली. ज्यावेळी चौकशीसाठी बोलावलं किंवा प्रश्नावली पाठवली, त्यावेळी ही उत्तरं दिली आहेत'.

'मी कालही चौकशीला सहकार्य केलं, आजही करतोय आणि उद्याही करणार आहे. माडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांबद्दल मला एकच सांगायच की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हा खटला नागपूर खंडपीठात सुरू आहे. त्यामुळे याबाबत मी फार काही बोलणार नाही. माझ्या एखाद्या वक्यव्यामुळे प्रकरणात कुठलीही बाधा येऊ नये याची काळजी घेतोय.
माझ्या वकिलांनी तशीच सुचना केली आहे. सरकार आपलं काम करतयं असं दिसत आहे. त्यामुळे मला याबाबत अधिक बोलायचं नाही.'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा