Advertisement

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध

प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जाहीरनामा आणि राज्य पातळीवर मोठ्या घोषणा करण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध
SHARES

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (maharashtra vidhan sabha election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपला निवडणूक जाहीरनामा (manifiesto) प्रसिद्ध केला. पक्षाने लढत असलेल्या सर्व मतदारसंघांसाठी विशिष्ट जाहीरनामा सादर केला. अनेक कार्यक्रमांतून या जाहीरनाम्याचे अनावरण करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी बारामतीत जाहीरनाम्याचे अनावरण केले. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत (mumbai) आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते गोंदियात जाहीरनाम्याचे अनावरण केले.

बारामती या त्यांच्या घरच्या मतदारसंघात अजित पवार यांनी बारामतीसाठी राज्यस्तरीय जाहीरनामा आणि क्षेत्रविशिष्ट जाहीरनामा या दोन्हींचे अनावरण केले. पक्षाने पहिल्यांदाच निवडणूक (maharashtra election 2024) लढवत असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार आणि स्थानिक नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकार स्थापनेच्या 100 दिवसांत महाराष्ट्राचा नवा व्हिजन आम्ही मांडणार आहोत.

पक्षाने 'माझी लाडकी बहिण योजने' अंतर्गत दिलेली रक्कम सध्याच्या 1,500 रुपयावरून प्रति महिना 2,100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. ज्यामुळे 2.3 कोटी महिलांना वार्षिक 25,000 रुपयांचा लाभ मिळेल.

राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात 11 नवीन आश्वासनांचा समावेश आहे. यामध्ये वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 1500 रुपयांवरून 2100 रुपये प्रति महिना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी, पक्षाने केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठिंब्यासह शेतकरी सन्मान निधी प्रति वर्ष 12,000 ते 15,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.

जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि एमएसपी अंतर्गत विकल्या गेलेल्या सर्व पिकांवर 20 टक्के अतिरिक्त अनुदानाचा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने धान्या उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 25,000 रुपये बोनस देण्याचे आश्वासनही दिले आहे.

"आम्ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 45,000 हून अधिक 'पाणंद' रस्ते बांधण्याचे वचन दिले आहे. ग्रामीण कृषी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ही सर्वात मोठी योजना आहे," असे जाहीरनाम्यात नमूद केले आहे.


हेही वाचा

मेट्रो स्टेशनवरून राजकीय वादाला तोंड फुटले

अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा